Saturday, May 18, 2024
Homeनाशिकविहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

कोल्हेर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून दोन तासांच्या प्रयत्नाने बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर शिवारात विहिरीत जयराम गवळी यांच्या विहिरीत बिबट्या पडला असल्याचे आढळून आले. येथील ग्रामस्थांनी वनविभागाला याची माहिती कळवली. वन विभागाकडून बिबट्यास बाहेर काढण्यासाठी पिंजरा लावण्यात आला.

दिंडोरी तालुक्याच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा जोशी घटनास्थळी दाखल झाल्या. विहिरीत बिबट्या असल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी या ठिकाणी गर्दी केली होती. विहीर जवळपास पन्नास फुटापेक्षा जास्त खोल आहे. विहिरीच्या कपारीत बसलेला बिबट्या दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पिंजर्‍यात आल्यानंतर वरती काढण्यात आले व त्याला वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी नाशिक येथे पाठवून दिले.

यावेळी रामचंद्र तुंगार, रूपाली देवरे, राऊत, अशोक काळे, अण्णा टेकनर, हेमराज महाले, हरिश्चंद्र दळवी, मायाराम पवार, रेश्मा पवार, ज्योती झिरवाळ, शिवाजी शार्दूल आदी कर्मचारी उपस्थित होते. भक्ष्याच्या शोधात बिबट्या आला असावा. तसेच या पट्ट्यात बिबट्याचा वावर दिसून येतो. गावाला लागून काही डोंगराळ भाग, काही जंगलाचा भाग असल्यामुळे बिबट्या या पट्ट्यात दिसून येतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या