Friday, November 22, 2024
Homeनाशिकबिबट्याचा धुमाकूळ; वनरक्षकांसह अकरा वर्षीय बालक,ग्रामस्थांवर हल्ला

बिबट्याचा धुमाकूळ; वनरक्षकांसह अकरा वर्षीय बालक,ग्रामस्थांवर हल्ला

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

घोटी । जाकीर शेख

इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन परिसरामध्ये गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका अकरा वर्षीय बालकावर बिबट्याचा हल्ल्याची घटना घडली होती. शुक्रवारी सकाळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पिंजरा लावण्यासाठी गेले असतांना या परिसरात रेस्क्यू ऑपरेशन असताना पिसाळलेल्या बिबट्याने वनरक्षकांवरती हल्ला केला आहे.

- Advertisement -

या बाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथे बिबट्याच्या हल्ल्यात ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला होता. यावेळी बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला. प्रवीण सारुक्ते असे जखमी झालेल्या मुलाचे नाव असून ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. प्रवीण सारुक्ते हा आपल्या घरापासून दोनशे मिटर अंतरावर असलेल्या शेतात आई वडिलांबरोबर गेला असता उसाच्या शेतात दबा धरून असलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. आई वडिलांनी आरडा ओरडा करून बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्याच्या तावडीतून मुलाला वाचविले. मात्र जाता जाता बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला. प्रवीण गंभीर जखमी असून त्याला घोटी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

इगतपुरीचे प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला पकडण्यासाठी शुक्रवारी सकाळीरेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. बिबट्याच्या हल्ल्यात १) कार्तिक मोहन सारूक्ते वय :२५ वर्षे रा. उंबरकोन ता. इगतपुरी. २) सतीश विष्णू सारूक्ते ,३७ वर्षे रा. उंबरकोन ३) किसन गोविंद सारूक्ते ४५ वर्षे रा. उंबरकोन , ४)यश खंडू बोराडे १८ वर्षे,रा. दौंडत, ५) श्रावण भीमा चिमटे वय २५ वर्षे, ६) राजाराम रामदास शिंदे ३१ वर्षे उंबरकोन, यांच्यासह १) फैज अली जाफर अली सय्यद वय ३० वर्षे २) भाऊसाहेब गणपत राव ५१ वर्षे ३) गोरख देवराम बागुल ४९ वर्षे ४)विठ्ठल पुंडलिक गावंडे ५१ वर्षे ५)चिंतामण देवराम गाडर ३३ वर्षे ६)कैलास लक्ष्मण पोटींदे ३४ वर्षे या सर्व जखमींवर घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. अविनाश गोरे, डॉ. संजना गायकर, यांच्यासह शितल पाटील, दिपक कुलकर्णी,दीपा कुलकर्णी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले. या हल्ल्यात जवळपास १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

या बिबट्याला पकडण्यासाठी नाशिक येथील डार्ट टीमला पाचारण करण्यात आले आहे. सायंकाळी ऊशीरा पर्यंत बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या