Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत 'कोसळधार' ; लोकलसह, ट्रेन, जनजीवन विस्कळीत

मुंबईत ‘कोसळधार’ ; लोकलसह, ट्रेन, जनजीवन विस्कळीत

मुंबई | Mumbai

मुंबईसह ठाण्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस (Mumbai Rainfall) पडत आहे. बदलापूर, उल्हासनगरमध्ये (Badlapur Ulhasnagar) देखील मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अप-डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. अंबरनाथ बदलापूर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली आहे.

- Advertisement -

रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूरहून सीएसएमटीच्या दिशेने वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे पनवेल ते बेलापूर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.सीएसएमटी ते अंबरनाथ आणि बदलापूर ते कर्जत लोकलसेवा (Badlapur To Karjat Local Service) सुरू आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि बदलापूरकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहे.

Uddhav Thackeray : उध्दव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट ; भेटीनंतर म्हणाले, सत्तेची साठेमारी

मागील ३ तासांत कल्याण, डोंबिवलीसह परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. विठ्ठलवाडी परिसरात मागील ३ तासांत जवळपास ५४ मिमी पाऊस तर कल्याण शहरात ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज असून, ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वसई-विरारच्या सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरदेखील पाणी साचल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या ठिकाणी पाणी साचले आहे सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना तारेवरची कसरत करीत रेल्वे स्टेशन गाठावे लागत आहे .

Monsoon Session : पोलीस उपनिरीक्षकाचा महिलेवर लैंगिक अत्याचार : तनपुरेंच्या लक्षवेधीची फडणवीसांकडून दखल

मध्य रेल्वेच वाहतूक विस्कळीत

कल्याण-कसारा रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तर सुमारे साडे-चार तासांपासून कल्याण-कर्जत रेल्वे सेवाही बंद आहे. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहे. राज्यासह मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. आज पावसाचा जोर वाढल्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.

दरम्यान मुंबई- पुणे किंवा पुणे-मुंबई ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई विभागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुंबई- पुणे किंवा पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

या ट्रेन रद्द

1) डेक्कन क्विन- 12123 सीएसएमटी-पुणे 19.7.23 आणि12124 पुणे-सीएसएमटी 20.7.23

2) सिंहगड एक्सप्रेस- सीएसएमटी -पुणे 19.07.23 आणि 11010 पुणे-सीएसएमटी20.07.23

3) डेक्कन एक्स्प्रेम- पुणे-सीएसएमटी 19.07.23 आणि 11007 सीएसएमटी-पुणे 20.07.23

4) इंटरसिटी- पुणे-सीएसएमटी 19.07.23 आणि 12127 सीएसएमटी-पुणे 20.07.23

5) इंद्रायणी- पुणे-सीएसएमटी 19.07.223 आणि 22105 सीएसएमटी-पुणे 20.07.23

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या