संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील चंदनापुरी (Chandanapuri) येथील आनंदवाडीमध्ये वास्तव्यास असलेल्या चारवर्षीय चिमुकलीचा (Little Girl) खेळता खेळता वीज पोलच्या ताणाला हात लागून जोरदार धक्का (Electric Shock) बसल्याने मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.22) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत संगमनेर (Sangamner) तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की आनंदवाडी येथील प्रतीक्षा संदीप केदार (वय 4) ही घरासमोर खेळत होती. त्याचवेळी तिचा तेथील वीज पोलच्या ताणाला हात ागला आणि जोरदार धक्का बसला. त्यानंतर तिला तत्काळ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. परंतु, उपचार करण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी शिवाजी रखमा केदार यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. दिघे हे करत आहे.





