Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याNCP Crisis : निलेश लंके अजितदादांच्या गोटात दाखल

NCP Crisis : निलेश लंके अजितदादांच्या गोटात दाखल

निलेश लंके हे अजितदादांच्या गोटात सामिल झाले आहे. निलेश लंके हे अजितदादांच्या शपथविधी सोहळ्यालादेखील उपस्थित होते. त्यानंतर दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असे त्यांनी ट्विट केले होते. यानंतर आता लंकेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांना आमदार भेटायला जात आहेत तर त्यात चुकीचं काय? दोन-चार आमदार वगळले तर सगळे आमच्याच बाजूने आहेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. दोन-चार आमदार वगळले तर सगळे आमच्याच बरोबर आहेत. कार्यकर्तेही आमच्याच बाजूने आहेत. अजित पवारांना किती प्रतिसाद मिळतो आहे तुम्ही बघू शकता. असंही भुजबळ म्हणाले. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की काही आमदार हे सिल्वर ओकवर जात आहेत. त्यावर भुजबळ म्हणाले, त्यात काय साहेबांनी बोलावलं तर जातात. मला बोलावलं तर मी पण जाऊन भेटून येईन. मला बोलावलं तर मीपण जाऊन भेटून येईन. असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.शरद पवारांच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे आमदार वाय बी सेंटरला पोहचत आहेत. आतापर्यंत किरण लहामटे, अशोक पवार,  रोहीत पवार,  देवेंद्र भुयार,  राजेंद्र शिंगणे,  अनिल देशमुख,  प्राजक्त तनपुरे हे आमदार पोहचले आहे.आपला फोटो वापरू नये, अशी शरद पवारांनी तंबी देऊन अजितदादांच्या गटाने स्टेजवर शरद पवारांचे फोटो लावले आहेत. याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवार हेच आमचे गुरू, नेते आहेत. त्यामुळे स्टेजवर त्यांचे फोटो लावले आहेत. आज शरद पवारांकडे दोन, चार आमदार जातीलच. मात्र, कार्यकर्ते आमच्यासोबतच आहेत. शरद पवार आमचे गुरू असल्याने त्यांच्या दर्शनाला आम्ही जाऊ. अजित पवारांना बोलावले तर अजित पवारांनाही सोबत घेऊन जाऊ. आमची भूमिका त्यांच्यासमोर समोर ठेवू.किरण लहामटे आणि अशोक पवार हे दोन आमदार अजित पवार यांच्या समवेत राजभवन येथे शपथविधीला सोबत होते. मात्र, आज शरद पवार यांच्या मेळाव्यासाठी वाय बी सेंटर या ठिकाणी दाखल झालेले आहेत.

यादरम्यान राज्यपालांना दिलेले पत्र आम्ही वाचले नव्हते. आमच्या खोट्या सह्या घेण्यात आल्याचा आरोप अशोक पवार यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.बहुतांश आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे असा दावा अजित पवार गटाचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी केलाय. अजित पवारांना राज्यातून मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे असं ते म्हणाले. वांद्रे येथील बैठकीआधी सुनील तटकरे अजित पवार यांचे निवासस्थान देवगिरीवर दाखल झाले आहेत. सुनील तटकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी बैठकीला येतील. आमच्यासोबत किती आमदार आहेत, हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल.शरद पवार गटाकडून मुंबईत जोरदार पोस्टरबाजी करण्यात आलीय. गडी एकटा निघाला, 83 वर्षांचा योद्धा असं या पोस्टरवर लिहिलंय. शरद पवारांचं निवासस्थान सिल्व्हर ओक आणि वायबी चव्हाण सेंटरवर ही पोस्टरबाजी करण्यात आलीय. या पोस्टरांच्या माध्यमातून भावनिक अपिल करण्यात आलंय़. खंडाळा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनी आपण शरद पवार यांच्या सोबत असल्याचे सांगितले आहे.
विधानसभेचे माजी अध्यक्ष माजी मंत्री, तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष चोपड्याचे अरुण गुजराथी यांनी सांगितले की, मी मुंबई येथे पोहोचलो असून शरद पवार साहेबांसोबत बैठकीला हजर राहणार आहे. मी शरद पवार साहेबांच्यासोबत राहणार.माजी मंत्री तथा घनसावंगीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे हे शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहेत. माझी पक्षनिष्ठा कायम आहे, मी कुठेही गेलेलो नाही. मंगळवारी चार तास सिल्वर ओकवर होतो. आजही पवार साहेबांसोबतच असणार आहे, असे टोपे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.आमदार किरण लहामाटे हे वायबी सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. किरण लहामाटे यांनी सांगितले की, शरद पवार हेच माझे दैवत आहेत. शरद पवार यांना सोडून इतर कुणासोबतही मी जाऊ शकत नाही.सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे. सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील दिशा देण्यासाठी ८३ वर्षांचा तरुण योद्धा म्हणजेच आपले सर्वांचे आदरणीय पवार साहेब उद्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत. पुढची रणनीती ठरवून पक्षाला दिशा देणार आहेत. त्यामुळे या बैठकीला आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. अवश्य या. लवकर या आणि सुरक्षितपणे या. महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने शरद पवार साहेबांवर नेहमीच जीवापाड प्रेम केलं आहे. साहेबांचा देखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नातं अतूट आणि पहाडासारखं भक्कम आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.राष्ट्रवादीच्या ४४ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये ४२ आमदार हे विधानसभेचे आहेत, तर २ आमदार विधान परिषदेचे असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या समर्थनाचं प्रतिज्ञापत्र दिले आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर चौथ्या दिवशीही कुणाकडे किती आमदार, याबाबत सस्पेन्स कायम आहे. शरद पवार आणि अजित पवार गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र बुधवारी या संदर्भातील सस्पेन्स दूर होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांकडून बोलावलेल्या बैठकीत कुणाकडे किती आमदार याचे चित्र स्पष्ट होऊन कोण ‘पॉवर’बाज हेही स्पष्ट होणार आहे. शिंदे गट जसा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा वापर करतो, त्याप्रमाणेच अजित पवार गटाकडून शरद पवारांचा फोटो वापरला जात आहे. मात्र, माझा फोटो वापरू नका, असा सज्जड इशारा शरद पवारांनी अजित पवार गटाला दिला आहे. त्यामुळे दोन्ही गटांमधील संघर्ष बराच काळ पेटता राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या