Saturday, May 4, 2024
Homeनाशिकपथविक्रेत्यांना कर्जवाटपास प्रारंभ

पथविक्रेत्यांना कर्जवाटपास प्रारंभ

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेअंतर्गत नागरी पथविक्रेत्यांना खेळते भांडवल म्हणून रोख दहा हजार रुपये मुदत कर्जवाटपास नगरपालिकेतर्फे प्रारंभ करण्यात आला. दोघा पथविक्रेत्यांना मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी प्रत्येकी दहा हजारांचा धनादेश प्रदान केला.

- Advertisement -

करोना प्रादुर्भावामुळे फेरीवाला व्यावसायिकांचे अतोनात हाल झाले असून पथविक्रेत्यांना व्यवसाय पूर्ववत सुरू करता यावा यासाठी केंद्र सरकारने ही महत्त्वांंकाक्षी योजना सुरू केली आहे.

नांदगाव शहरातील पथविक्री करणार्‍या व 24 मार्च 2020 पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या सर्व पात्र पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. प्रत्येकी दहा हजार रुपयांचे वार्षिक खेळते भांडवल कर्ज दिले जाणार आहे.

लाभार्थ्यांना सात टक्के अनुदान मिळणार आहे. कर्जाची परतफेड नियमित केल्यास सात टक्क्यांवरील व्याज भरण्यासाठी अनुदान तसेच लाभ मिळू शकतील. यासाठी बँकेला कोणतेही तारण द्यावे लागणार नाही.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पथविक्रेते किशोर खैरनार व सोमनाथ पिंगळे या दोघांना प्रत्येकी दहा हजाराचे धनादेश मुख्याधिकारी गोसावी यांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष राजेश कवडे, बँक ऑफ महाराष्ट्र शाखाधिकारी सरोजकुमार शर्मा, त्रिपाठी, कर्ज वितरण अधिकारी आनंद महिरे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या