नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जबरी लूट केल्यानंतर पसार असलेल्या सराईत गुन्हेगारास (Criminal) गावठी कट्ट्यासह अटक (Arrested) करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या (Crime Branch) पथकाने इगतपुरीतील नांदगाव सदाे येथे ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुरुषोत्तम संजय गिरी उर्फ गग्गा (२०, रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. स्थानिक गुन्हेशाखेचे प्रकाश कासार यांना संशयित इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) नांदगाव सदो या परिसरात असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने सापळा रचून त्यास जेरबंद केले.त्याच्याकडे गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस सापडले आहे.
दोन महिन्यांपासून ग्रामीण पोलीस त्याच्या मागावर होते. इगतपुरीतील दुकानदारास जबरीने मारहाण (Beating) करून लुट केल्याचा गुन्हा दोन महिन्यांपूर्वी दाखल होता. त्यावेळी तो नुकताच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर बाहेर आला होता. संशयित गग्गा सराईत असून त्यांच्याविरोधात इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे पोलीसात खून, प्राणघातक हल्ला, जबरी चोरी, लुटमार, चोरी, अवैधरित्या शस्त्र बाळगणे यासारखे ८ गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहायक निरीक्षक गणेश शिंदे, अंमलदार विनोद टिळे, प्रकाश कासार, संदीप झाल्टे, आबा पिसाळ, हेंमत गिलबिले, प्रदीप बहिरम, भाऊसाहेब टिळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा