Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर?

नवी दिल्ली | New Delhi

महाराष्ट्रातील प्रमुख महानगरपालीकांबरोबरच (Municipal Corporation) अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (local bodies) निवडणुकांची प्रतीक्षा सर्वांनाच लागली असताना, आता ह्या निवडणुका आणखी काही कालावधींसाठी लांबण्याची चिन्हे दिसत आहे.

- Advertisement -

त्याचे कारण म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरू असलेली सुनावणी १४ मार्च पर्यंत पुढे ढकलली आहे. आधी कोर्टाच्या संकेतस्थळावर २१ मार्च ही तारीख दाखवली जात होती. परंतु आता सुनावणी १४ मार्चला ही सुनावणी  होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

धक्कादायक! तरुणाचा कबड्डी खेळताना मैदानातच मृत्यू

यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Elections) पावसाळ्यापूर्वी होणार का, याबाबत शंका निर्माण झाली आहे. राज्यातील २७ महानगरपालिकांपैकी २३ महापालिकेची मुदत याआधीच संपलेली आहे.

उर्वरित ४ महापालिका यामध्ये सांगली-मिरज महापालिकेची मुदत १९ ऑगस्ट २०२३ रोजी, जळगाव महापालिकेची मुदत १७ सप्टेंबर २०२३ रोजी, अहमदनगर महापालिकेची मुदत २७ डिसेंबर २०२३ रोजी तर धुळे महापालिकेची मुदत ३० डिसेंबर २०२३ रोजी संपणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी १० मिनिटं वाचला जुनाच अर्थसंकल्प; विरोधकांच्या गोंधळानंतर सभागृह तहकूब

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका याआधी कोरोनामुळे, नंतर ओबीसी राजकीय आरक्षणामुळे (reservation) आणि आता सत्ताबदलामुळे रखडल्याचं दिसत आहे. त्यातच वेगवेगळ्या कारणांनी सर्वोच न्यायालयातील सुनावणी दिवसेंदिवस लांबत आहे. आता पुढील सुनावणी दिलेल्या नव्या तारखेच्या दिवशी होणार की, पुन्हा नवी तारीख मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या