Wednesday, June 19, 2024
Homeमुख्य बातम्यालोकसभा निवडणूक २०२४ : दिंडोरीत पाच उमेदवारांंचे एबी फॉर्म दाखल

लोकसभा निवडणूक २०२४ : दिंडोरीत पाच उमेदवारांंचे एबी फॉर्म दाखल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत ९उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी दाखल करण्याच्या आदल्या दिवसापर्यंत ५ जणांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दिंडोरीत बहुरंगी लढत अटळ आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे, माकपचे जीवा पांडू गावित, भारतीय आदीवासी पार्टीचे शिवाजी बर्डे व बीआरएस पक्षाचे भारत पवार यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. याव्यतिरिक्त हरिश्चंद्र चव्हाण (अपक्ष), बाबू सदू भगरे (अपक्ष) व पल्लवी भास्कर भगरे (अपक्ष) यांचे मिळून १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

आज दिवसभरात ४ अर्जांची विक्री झाल्याने उद्या माघारीनंतर कोण-कोण निवडणूक मैदानात राहते हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल. डॉ. भारती पवार यांच्यासोबत विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, सुहास कांदे यांच्याकडून मोठी ताकद उभी राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे पिंपळगाव बसवंत येथे नियोजन केले जात आहे. आज डॉ. पवार यांचा उमेदवारी अर्ज भरतेेवेळी मुख्यमत्री व उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या