मुंबई | Mumbai
देशासह महाराष्ट्र आज सकाळपासून लोकसभेच्या (Loksabha) चौथ्या टप्प्यातील मतदानास (Voting) सुरुवात झाली आहे. यामध्ये देशातील १० राज्यांमधील आणि केंद्रशासित प्रदेशातील ९६ मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यात महाराष्ट्रातील (Maharashtra) नगर दक्षिण, शिर्डी, नंदुरबार, जळगांव, रावेर, पुणे, शिरूर, मावळ, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले त्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार जळगावमध्ये ६.१४, जालना ६.८८, नंदूरबार ८.४३, शिरूर ४.९७, अहमदनगर ५.१३, छत्रपती संभाजीनगर ७.५२, बीड ६.७२, मावळ ५.३८ रावेर, ७.१४ शिर्डी ६.३८ आणि पुण्यात ६.६१ टक्के मतदान झाले होते. या सर्व मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास सकाळी नऊ वाजेपर्यंत महाराष्ट्रात एकूण ६.१४ टक्के मतदान झाले होते.
तर सकाळी ११ वाजेपर्यंत जळगावमध्ये १६.८९, जालना २१.३५, नंदुरबार २२.१२, शिरूर १४.५१, अहमदनगर १४.७४ छत्रपती संभाजीनगर १९.५३, बीड १६.६२, मावळ १४.८७, पुणे १६.१६, रावेर १९.०३ आणि शिर्डीत १८.९१ टक्के मतदान झाले आहे. या सर्व मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास सकाळी ११ वाजेपर्यंत महाराष्ट्रात १७.५१ टक्के मतदान झाले आहे.
दरम्यान, यावेळी विविध उमेदवारांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे पुण्याचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, नगरचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे, महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके जळगावच्या भाजप उमेदवार स्मिता वाघ, नंदुरबारच्या उमेदवार हीना गावित, छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी देखील मतदान केले.