नाशिक | Nashik
नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी (Nashik and Dindori Loksabha) (दि.२० मे) रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज मंगळवार (दि.४ जून) रोजी निकाल जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड परिसरातील एका गोडाऊनमध्ये या दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे.
नाशिक लोकसभेत ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे, शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभेत सुरुवातीला पोस्टल मतांच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून यात महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आघाडीवर आहेत.
तर दिंडोरीत पोस्टल मतांमध्ये भास्कर भगरे आघाडीवर असून भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार पिछाडीवर आहेत. तसेच धुळ्यात पोस्टल मतांमध्ये भाजपचे डॉ. सुभाष भामरे आघाडीवर आहेत. याशिवाय शिर्डीत ठाकरे गटाचे उमदेवार भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत. तसेच नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी आघाडीवर आहेत.