Saturday, July 27, 2024
Homeनगरदुहेरी हत्याकांडप्रकरणी शिर्डीतील आरोपी दोन महिन्यांनंतर जेरबंद

दुहेरी हत्याकांडप्रकरणी शिर्डीतील आरोपी दोन महिन्यांनंतर जेरबंद

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

लोणी येथील दोन युवकांची हत्या करून दोन्ही मृतदेह गोणीत भरून कसारा घाटात फेकून दिल्याची घटना सोमवारी समोर आली असून हत्या केलेले दोन्ही आरोपी शिर्डीतील असून त्यांना पोलिसांनी 2 महिन्यांनंतर जेरबंद केले.

- Advertisement -

29 जून 2023 रोजी कसारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस पेट्रोलिंग करत असताना एका इसमाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह असल्याचे सांगितले. याठिकाणी कसारा पोलिसांनी पाहणी केली असता त्या दोन्ही इसमांचा खून झाल्याचे आढळून आले. हे अनोळखी मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी रितसर पंचनामा केला. पोलिसांनी तंत्रज्ञाचा वापर करत तपासाची चक्रे फिरविली व त्यात मुख्य आरोपी मनोज नाशी हा निष्पन्न झाला. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या दुहेरी हत्याकांडाचा तपास गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होता.

ताब्यात घेतलेल्या आरोपीने घटनेची माहिती देताना आपल्या बहिणीला दोन तरुण सोशल माध्यमाच्या आधारे त्रास देत होते व याचाच मनात राग धरून सुफीयान सिराबक्ष रा.लोणी, ता. राहाता व साहिल पठाण, रा. सोनगाव, ता. राहुरी या त्रास देणार्‍या तरुणांची हत्या केल्याची कबुली आरोपी मनोज नाशी याने दिली. या हत्याकांडात शिर्डी येथील कुणाल प्रकाश मुदलियार, प्रकाश अंबादास खलुले, फिरोज दिलदार पठाण हे सहभागी असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रमेश दळवी यांनी दिली.

मोबाईल व सोशल माध्यमाचा वापर किती घातक ठरू शकतो हेच या दुहेरी हत्याकांडातून समोर आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या