Saturday, May 4, 2024
Homeनाशिकशहर बससेवा बंदमुळे आर्थिक भुर्दंड

शहर बससेवा बंदमुळे आर्थिक भुर्दंड

नवीन नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील बससेवा अद्यापपर्यंत बंद असल्याने तसेच करोनाचे निर्बंध व काही अटींमुळे प्रवाशांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने शहरातील बस सेवा बंद आहे. सध्या सुरक्षित अंतर ठेवण्याच्या नियमामुळे रिक्षामध्ये फक्त दोनच प्रवासी वाहतूक करतांना दिसून येत आहेत.

यापूर्वी ज्याठिकाणी प्रतिसीट 20 रुपये खर्च येत होता त्याठिकाणी आता प्रवाशांना सुमारे 40 रुपये द्यावे लागते. महाराणा प्रताप चौक ते सीबीएस किंवा शालीमार या ठिकाणी जाण्याचा हा दर आहे.

यामध्ये ना रिक्षा चालकाची चूक आहे ना प्रवाशांची. दि.22 मार्च पूर्वी शहरात बससेवा चालु होती. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक फायदा होत होता. मात्र सद्य परिस्थितीत अजुन किती दिवस बससेवा बंद राहणार हे येणारी वेळच सांगेल.

सध्या पुर्वीप्रमाणे व्यवसाय सुरू नाही. त्यामुळे शहरातुन नवीन नाशिकमध्ये परततांना कधी कधी तर दिवसातून एकच फेरी होते. यामुळे आर्थिक लढाई सुरू आहे. मात्र करोनाचे संकट गेल्यावर रिक्षा भाडे सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.

किरण भागवत, रिक्षाचालक

शहर बससेवा लवकर सुरु होणे गरजेचे आहे. यामुळे प्रवाशांचे आर्थिक नुकसान होणार नाही. बाहेरगावच्या बससेवा सुरु झाल्यात, त्याचप्रमाणे शहर बससेवा पूर्वरत सुरू झाल्यास प्रवाशांचे आर्थिक नुकसान टळेल.

अमोल भालेराव, नागरिक

- Advertisment -

ताज्या बातम्या