Saturday, May 4, 2024
Homeनाशिकजुगारात लाखो रुपये गमावले

जुगारात लाखो रुपये गमावले

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मी तुम्हाला चांदीची ऑर्डर मिळवून देतो तुम्ही मला पैसे द्या, असे सांगत व्यावसायिकांकडून 70 लाखांपर्यंतचे चांदीचे मटेरियल घेऊन ते परस्पर विकून रक्कम गोळा करत ती सर्व रक्कम जुगारात हरल्याचा ( The amount is lost in gambling ) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ( Ambad Police Station )गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर गजमल पाटील असे फसवणूक केलेल्याचे नाव आहे.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेत या महाभागाने जुगारात कर्जबाजारी झाल्याचे लक्षात येताच ज्यांच्याकडून पैसे घेतले आहेत, त्यांना व कुटुंबाला कर्जबाजारी झाल्याचा मेसेज टाकून प्रकार कळविल्याचेही समोर आले आहे.

मी सर्व पैसे रौलेट जुगारात हरलो आहे, त्यातून कर्जबाजारी झालो. मला माफ करा, मी तुमची फसवणूक केली आहे, असेही पाटील याने मेसेजद्वारे तक्रारदार व्यावसायिक आणि कुटुंबाला कळवले.

याप्रकरणी गौरव रमाकांत सिंग (35, रा. नाशिक, मूळ रा. कोलकता) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सिंग यांच्याकडे ओळखीतील व्यक्ती मयूर पाटील याला घेऊन आले होते. मयूर हा अंबडला एका कंपनीमध्ये कामाला असून तो सिडकोच्या योजनेच्या घरात भाडेतत्वावर राहतो. त्याने यावेळी आमच्या कंपनीला चांदीची गरज भासते. तुम्ही चांदीचा व्यवसाय सुरू करत असाल तर माझ्या ओळखीने तुम्हाला जास्त ऑर्डर मिळवून देतो, असे पाटील याने सिंग यांना सांगितले.

त्यानुसार सन 2018 पासून सिंग यांनी सुगमा एंटरप्रायझेस नावाने सिल्व्हर मटेरिअल सप्लायचा व्यवसाय सुरू केला. त्यानुसार मयूर याच्या माध्यमातून कंपनीशी व्यवहार सुरू झाले. सुरुवातीला दिलेल्या ऑर्डरचे पेमेंट ऑनलाइन आल्यामुळे सिंग यांचा मयूर पाटील याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर मटेरिअल दिलेल्या कंपन्यांकडून सिंग यांना पूर्वीसारखे पेमेंट आले नाही. पाटील याने सिंग यांच्याप्रमाणेच अनेक जणांकडून चांदीचे मटेरिअल विकत घेऊन ते सराफ बाजारातील दोन सराफांना काळ्याबाजारात या भावात विक्री केल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.

सिंग यांनी मयूरच्या घरी जाऊन चौकशी केली असता घरच्यांनाही त्याने तोच मेसेज केल्याचे समजले. मयूर पाटील याने विविध कंपन्यांच्या नावाने सिंग यांच्यासह सचिन उंडे, हरीश जोशी यांच्याकडून सुमारे 60 ते 70 लाख रुपये किमतीचे चांदीचे मटेरिअल स्वत: कडे ठेवत त्याची परस्पर विक्री करुन फसवणूक केली आहे. पाटील याने गेल्या दोन वर्षांत अनेकांककडून व्यवसायाच्या नावे पैसे घेऊन हेच पैसे रौलेट जुगारात लावल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर हवालदार रवींद्र पानसरे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या