Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजTejasvee Ghosalkar: खूप काही बोलायचे आहे पण…; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी...

Tejasvee Ghosalkar: खूप काही बोलायचे आहे पण…; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली आपली व्यथा

मुंबई | Mumbai
दहिसर येथील ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत मुंबईतील वसंत स्मृती कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. हा पक्ष प्रवेश अगदी काही मिनिटांमध्ये पार पडला. यावेळेस मोजक्या शब्दांमध्ये तेजस्वी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या खऱ्या मात्र त्या फारसे काही बोलल्या नाहीत.

“2017-2022 कार्यकाळातील माजी नगरसेविका शिवसेना आता उबाठा गटाच्या तेजस्वी अभिषेक घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. मी मुंबई भाजपाचा अध्यक्ष म्हणून त्यांचे भाजपामध्ये स्वागत करतो,” असे म्हणत अमित साटम यांनी तेजस्वी यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केली. भाजपाने मुंबईत केलेला विकास पाहून तेजस्वी घोसाळकर पक्षात प्रवेश करत असल्याचे अमित साटम यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी पुष्पगुच्छ देऊन तेजस्वी घोसाळकरांचे पक्षात स्वागत केले.

- Advertisement -

हा निर्णय कठीण आहे
भाजपात प्रवेश केल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी त्यांची व्यथा मांडत खूप गोष्टी आहेत, त्या मी बोलू शकत नाही. हा निर्णय कठीण आहे. ज्यांनी मला ओळख दिली तो पक्ष सोडताना दु:ख होतेय. पण माझ्या प्रभागातील विकासकामे करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले.

YouTube video player

खूप काही बोलायचे आहे परंतू…
पक्षप्रवेश सोहळ्यात तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या की, खूप काही गोष्टी बोलायच्या आहेत परंतु त्या कसे बोलू माहिती नाही. मला विकासाची कामे करायची आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माझी सगळी कामे होतील अशी मला अपेक्षा आहे. अभिषेकची हत्या झाली त्याचा सीबीआय संथगतीने तपास करत आहे. मात्र या तपासाला गती देऊन मला आणि घोसाळकर कुटुंबाला न्याय मिळेल हीच अपेक्षा माझी मुख्यमंत्र्यांकडे आहे. जे काम माझ्यावर पक्ष सोपवेल ती जबाबदारी मी पार पाडेन असे त्यांनी म्हटले आहे.

कोण आहे तेजस्वी घोसाळकर?
तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून वॉर्ड क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व असलेल्या मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचवेळी त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरु झाली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार २१०० रुपये? एकनाथ शिंदे...

0
मुंबई । Mumbai "माझी लाडकी बहीण योजना ही केवळ घोषणा नसून ती राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणाचे एक मोठे साधन आहे. ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार...