Friday, May 3, 2024
Homeनगरलॉटरीच्या नावाखाली सव्वा लाखांची फसवणूक

लॉटरीच्या नावाखाली सव्वा लाखांची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाखाली सर्जेपुरा भागातील तरूणाची एक लाख 33 हजार 200 रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात मोबाईल नंबर धारक व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण गजराज अरूणे (वय 29 रा. सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

राहुरीत अवैध औषधाच्या गोदामावर पोलीसांचा छापा

फिर्यादी यांना एक दिवस एका मोबाईल नंबरवरून फोन आला की, ‘आम्ही कौन बनेगा करोडपती’ मधून बोलत आहोत. तुमचा मोबाईल क्रमांक हा लकी विनर म्हणून निवडला आहे. त्यावरून तुम्हाला 25 लाख रूपयांची लॉटरी देण्यात येत आहे. त्यानंतर दुसर्‍या नंबरहूनही असाच फोन आला. या दोन्ही मोबाईल क्रमांक धारक व्यक्तींनी फिर्यादीशी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच 25 लाखाची लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी प्रोसेसिंग फी, इन्कमटॅक्सच्या नावाखाली सुरूवातीला काही पैसे त्यांचे गुगल पे अकाऊंटवर पाठविण्यास सांगितले.

नगर जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व सिध्द करणार

25 लाख रूपये मिळणार या आशेवर फिर्यादी यांनी 20 ऑगस्ट 2021 ते 10 मार्च 2022 या कालावधीत तब्बल एक लाख 33 हजार 200 रूपये गुगल पे तसेच बँक खात्यावर पाठविले. त्यानंतर तिनही मोबाईल नंबर बंद झाले. अनेक वेळा संपर्क करूनही त्या मोबाईल धारकांशी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही व त्यांना लॉटरीचे पैसेही मिळाले नाहीत. फिर्यादी यांनी 1 ऑगस्ट रोजी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.

श्रीरामपुरात अनेक भागात नळाला दूषित पाणी

- Advertisment -

ताज्या बातम्या