Saturday, April 26, 2025
Homeक्राईमधक्कादायक! लग्नाआधी मुलाने केले 'प्रेमसंबंधांचे' व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! लग्नाआधी मुलाने केले ‘प्रेमसंबंधांचे’ व्हिडिओ व्हायरल

गोरखपूरच्या तिवारीपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका मुलीचे लग्न दिल्लीतील एका मुलासोबत निश्चित करण्यात आले होते. कुटुंबातील सदस्यांची लगबग झाली आणि दोघांमध्ये भेटीगाठींची मालिका सुरू झाली. दोघेही आपला बराचसा वेळ एकत्र घालवू लागले, एकत्र फिरायला लागले आणि गोड बोलू लागले. दरम्यान, त्यांच्यात जवळीक वाढली आणि दोघांनी एकत्र खाजगी क्षण घालवले, परंतु उत्साहात हरवलेल्या या जोडप्याने त्या खासगी क्षणांचे काही व्हिडिओही बनवले.

हे ही वाचा : सायबर फसवणुकीला उधाण

- Advertisement -

दोघांनीही लग्न न करताच आपला बराचसा वेळ एकत्र घालवायला सुरुवात केली खरी; पण कालांतराने मतभेद आणि मग मनभेद सुरू झाले. दरम्यान, घरातील सदस्यांमध्ये काही वाद झाले आणि भांडणामुळे लग्नाआधीच गोष्टी बिघडल्या. दरम्यान, एक आरोप समोर आला. मुलाने रागाच्या भरात त्यांच्या खासगी क्षणांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचा आरोप मुलीने केला. हे प्रकरण आता पोलीस ठाण्यात पोहोचले असून पोलीस तपास करत आहेत. मोहसीन अन्सारी असे या मुलाचे नाव असून तो दिल्लीतील संगम विहार भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : ऑनलाईन सट्टेबाजी आणि क्रौर्य

१० मे २०२३ रोजी मोहसीन अन्सारीचे गोरखपूरमध्ये राहणाऱ्या मुलीशी लग्न झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. एंगेजमेंटनंतर दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरू झाले. एकमेकांना जाणून घेण्याच्या इच्छेने ते व्हिडीओ कॉल करू लागले, पण समाधान न झाल्याने ते एकमेकांना भेटू लागले. कधी मोहसीन गोरखपूरला जायचा तर कधी मुलगी दिल्लीला यायची. दोघेही एकमेकांच्या जवळ आल्यावर त्यांना एकमेकांच्या उणीवाही दिसू लागल्या. आणि त्या दोषांमुळे त्यांचे लग्नही तुटले. पण जेव्हा मुलीच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले तेव्हा परिस्थिती आणखी बिघडली. हा प्रकार घरच्यांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी मोहसीनच्या कुटुंबीयांना सोशल मीडियावरून व्हिडिओ हटवण्यास सांगितले तेव्हा त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे पोलिसांना समजले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

भारताच्या

Pahalgam Terror Attack: भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; सलग दुसऱ्या...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारताने उचललेल्‍या कडक पावलामुळे पाकिस्‍तानची झोप उडाली आहे. पाकिस्‍तानच्या सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन केले...