Friday, May 3, 2024
Homeनगर‘लव्ह जिहाद’ दोन आरोपी अद्याप पसारच

‘लव्ह जिहाद’ दोन आरोपी अद्याप पसारच

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरातील लव्ह जिहादाच्या प्रकरणाने कोपरगावसह संपूर्ण जिल्हा हादरला असून घटनेचे गांभीर्य पोलीस प्रशासनाने घेतले असले तरी दोन आरोपी अद्याप पसार आहेत. त्यांच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली असून त्याचा तपास युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली आहे. दरम्यान अटक केलेल्या दोन आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

- Advertisement -

कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या इंदिरापथ येथील 20 वर्षीय युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर कोपरगावात खडकी जवळील मदरशात नेऊन अतिप्रसंग केला. तिच्या मर्जीविरोधात शरीरसंबंध करुन त्याचे फोटो व व्हिडिओ तयार करून युवतीला ब्लॅकमेल करुन इंदौर येथे बोलावून तिच्यावर पुन्हा अतिप्रसंग व बळजबरीने धर्मांतर करुन तिचेकडून नमाज पठण केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात इंदौरच्या मौलवीसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली होती.

‘लव्ह जिहाद’च्या घटनेने कोपरगाव हादरले

या प्रकरणातील इमरान आयुब शेख, रा. कोपरगाव, फय्याज (पूर्ण नाव माहीत नाही) रा. कोपरगांव या दोन आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना शनिवार दि. 15 जुलैपर्यंत तर मुख्य आरोपी सायम कुरेशी रा. जुना पिठा, इंदौर, मध्यप्रदेश, याला तेथून अटक करून कोपरगाव न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार दि. 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती तपासी अधिकारी भरत दाते यांनी दिली. उर्वरित दोन आरोपींचा देखील कसून शोध घेण्याचे प्रयत्न देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

असे प्रकार वारंवार होऊ नये यासाठी देखील प्रशासन स्तरावर कडक कारवाई होऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तसेच अशा संवेदनशील विषयासंदर्भात कोणी पडद्याच्या मागून काही डाव साधण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. तसेच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरणे महत्वाचे आहे.

ज्या मदरशात हे प्रकरण घडले त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे असून या गुन्ह्याला तेथील चालकाची मूक संमती होती असे स्पष्ट होत असून महाराष्ट्रसह देशात इतक्या मोठ्या प्रमाणावर लव्ह जिहाद सारख्या अनेक घटना घडत असताना शासनाने अद्याप देखील लव्ह जिहादविरुद्ध कायदा केलेला नाही. येत्या पावसाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधात कायदा करुन आरोपींना कडक शासन करावे, अशी मागणी हिन्दू जनजागृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्यात सध्या एक अत्यंत जहरी विष पसरत आहे. 10 वर्षांच्या मुलीपासून तर 40-45 वर्षांच्या गृहिणींना विशिष्ट धार्मिकस्थळातून पैसे आणि प्रशिक्षण घेतलेले मुस्लिम तरुण खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत आहेत. अत्याचार आणि वेश्या व्यवसायात या मुलींचा ते बळी देत आहेत. अत्यंत गंभीर स्वरूप या प्रकाराने घेतले असून बळी पडणार्‍या मुलींची संख्या वाढलेली आहे. आपली मुलगी कुठे शिकते, तिचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, मोबाईल रिचार्ज कुठे करते, गाडी दुरुस्त कुठे करते इथपासून तर घरी येणारा भंगारवाला, भाजीवाला, गवंडी, पेंटर, गादीवाला किंवा अगदी फेसबुकवर हिंदू नावाने मैत्री करून व अन्यप्रकारे तिच्या संपर्कात अशा प्रकारचे लव्ह जिहादी तर नाही ना, याची खात्री करा. ‘माझी मुलगी असे करूच शकत नाही’ असे म्हणणार्‍यांच्या मुली यात अधिक आहेत. सावध व्हा आणि काही मदत लागल्यास योग्य व्यक्तींचा किंवा पोलिसांचा सल्ला आवश्य घ्या, असे आवाहन हिंदू जागरण समितीतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या