Sunday, September 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजLPG Supply: गॅस टंचाईतून मोठा दिलासा मिळणार! ४७ हजार मेट्रीक टन LPG...

LPG Supply: गॅस टंचाईतून मोठा दिलासा मिळणार! ४७ हजार मेट्रीक टन LPG घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या काही दिवसांपासून देशात जाणवणारा एलपीजी तुटवडा आता दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘शिवालिक’ या जहाजानंतर आता ‘नंदा देवी’ हे दुसरे महाकाय जहाज ४७ हजार मेट्रिक टनांहून अधिक गॅस घेऊन गुजरातच्या वडीनार बंदरात सुखरूप दाखल झाले आहे.

नंदा देवी व्हेसलचे सीईओ यांनी सांगितले की भारतीय बंदर, जहाजे आणि जलमार्ग मंत्रालय आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यासाठी पुढाकार घेतला होता. याचबरोबर भारतीय नौदल आणि इराणच्या नौदलाने हार्मुझ सामुद्रधूनीमधून बाहेर पडण्यासाठी आवश्यक ती सहाय्यता केली.

- Advertisement -

“आता चर्चा नाही तर फक्त…”; पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान बदला घेण्याच्या तयारीत?

४६,५०० मेट्रिक टन एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ हा अजस्त्र टँकर वडीनार (कांडला) बंदरावर दाखल झाला आहे, जिथे नांगरणी क्षेत्रात जहाजातून जहाजात (STS) हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा एलपीजी ‘नंदा देवी’ मधून ‘MT BW Birch’ नावाच्या दुसऱ्या जहाजावर हस्तांतरित केला जाईल. हे हस्तांतरण आजपासून सुरू होणार असून, देशातील एलपीजी पुरवठा मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यावेळी, दीनदयाळ बंदर प्राधिकरणाचे (डीपीए) अध्यक्ष सुशील कुमार सिंह स्वतः ‘नंदा देवी’ जहाजावर जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जहाजाचे कॅप्टन आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि हस्तांतरण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला.

या दोन्ही जहाजांमुळे देशातील गॅस पुरवठ्याला मोठी बळकटी मिळणार आहे.

नंदा देवी: ४७,००० मेट्रिक टन LPG (वडिनार बंदर).

शिवालिक: ४६,००० मेट्रिक टन LPG (मुंद्रा बंदर).

दक्षिणेतही पोहोचणार तेलसाठा
मिळालेल्या माहितीनुसार, शिवालिकमधून आलेला २०,००० टन एलपीजी मुंद्रा येथे उतरवण्यात येईल, तर उर्वरित २६,००० टन एलपीजी मंगळूरच्या बंदरात पाठवण्यात येईल. दरम्यान, नंदा देवी जहाज गुजरातमध्ये दाखल झाल्यानंतर, त्यातील २४,००० मेट्रिक टन एलपीजी तातडीने तामिळनाडूच्या दिशेने रवाना केला जाणार आहे. यामुळे दक्षिण भारतात जाणवणारी टंचाई देखील लवकरच दूर होईल.

जग लाडकी टँकर आज दाखल होणार
शनिवारी संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) फुजैरा बंदरातून निघालेला ‘जग लाडकी’ हा कच्च्या तेलाचा टँकर मंगळवारी दुपारी मुंद्रा येथे पोहोचण्याची शक्यता आहे. या जहाजात अंदाजे ८१,००० टन मूरबान कच्चे तेल आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी फुजैरा तेल टर्मिनलवर हल्ला झाला, त्याच दिवशी हे जहाज निघाले.

नंदा देवी सारखेच अजून २२ भारतीय व्हेसल हे पर्शिय गल्फमध्ये अडकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून व्यापारी जहाजांना सुरक्षा देऊन त्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : ‘त्या’ तरुणाचा मृतदेह घेऊन नातेवाईकांची महापालिकेवर धडक;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरातील कृषी नगर जॉगिंग ट्रॅकजवळ कामावरून घरी परतत असताना रात्रीच्या वेळी पावसामुळे आणि अंधार असल्यामुळे रस्त्यात आडवे टाकलेले काळे पाइप्सवर...