Saturday, May 2, 2026
Homeदेश विदेश"आता चर्चा नाही तर फक्त…"; पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान बदला घेण्याच्या तयारीत?

“आता चर्चा नाही तर फक्त…”; पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान बदला घेण्याच्या तयारीत?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
एकीकडे इराण इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर तणाव वाढलेला असतानाच दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी रात्री पाकिस्तानने ऑपरेशन गजब लिल हक अंतर्गत अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा एअर स्ट्राईक केला. पाकिस्तानने काबूल येथील एका अमली पदार्थ व्यसनमुक्ती केंद्राला लक्ष्य केले. या हल्ल्यामध्ये ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

पाकिस्तानच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर तालिबानने प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने या हल्ल्याचे फुटेज सोशल मीडियावर शेअर करत आम्ही सैन्य ठिकाणांवर हल्ला केल्याचे सांगितले. या हल्ल्यानंतर इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहीद यांनी टोलो न्यूजला सांगितले की पाकिस्तानसोबतच्या कुटनैतिक चर्चेची वेळ आता निघून गेली आहे. आता अफगाणिस्तान बदला घेणार, डूरंड लाईनवर दोन्ही देशांचे सैन्य सतत एकमेकांना भिडत आहे.

- Advertisement -

Weather Update: गुढीपाडव्याला राज्यावर अवकाळीचं सावट; या जिल्ह्यांना ‘अलर्ट’

नेमकी घटना काय घडली?
पाकिस्तानी सैन्याने काबूलमधील एका व्यसनमुक्ती केंद्रावर एकाच वेळी अनेक बॉम्ब टाकले. हल्ल्याच्या वेळी रुग्णालयात २,००० लोक होते. त्यापैकी ४०० जणांचा मृत्यू झाला, तर २५० जण गंभीर जखमी झाले. अनेक जण चिंताजनक अवस्थेत असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, असा अधिकाऱ्यांनी दावा केला आहे. पाकिस्तानने व्यसनमुक्ती केंद्राव्यतिरिक्त इतर अनेक ठिकाणीही हल्ले केले. या हल्ल्यात रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आणि त्याचा बराचसा भाग आगीत जळून खाक झाला.

सुरक्षेसाठी हल्ला गरजेचा होता-पाकिस्तान
पाकिस्तानने काबूल आणि नंगरहारमध्ये हल्ला आपल्या सुरक्षेसाठी गरजेचा होता असे सांगितले. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी नुकतेच अफगाण – तालिबानने पाकिस्तानमधील नागरिकांना टार्गेट करून रेड लाईन क्रॉस केल्याचे सांगितले होते. यानंतर लगेच रात्री काबूलमध्ये एअर स्ट्राईक झाला. पाकिस्तानने दावा केला की त्यांनी लष्करी तळांवर हल्ला केला आहे.

दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढला
२१ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. या हल्ल्यांनंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकमेकांवर वारंवार हल्ले केले आहेत. दोन्ही देशांच्या हल्ल्यांमध्ये शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर हजारो लोकांना आपली घरे सोडून पलायन करण्यास भाग पडले आहे.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...