Sunday, May 19, 2024
Homeनगरलम्पीग्रस्त पाच गायी दगावल्या

लम्पीग्रस्त पाच गायी दगावल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात लम्पी रोगाची व्याप्ती वाढत असून शनिवारी एकाच दिवसात पाच गायी दगावल्या आहेत. यामुळे लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांची संख्या 26 झाली आहे. तर एकूण लम्पीग्रस्त जनावरांची संख्या 663 झाली असून यापैकी 313 जनावरांनी लम्पीवर मात केली आहे. तर 350 जनावरांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यात लम्पीचा विळखा घट्ट होत आहे. पशूसंवर्धन विभागाने तातडीने जनावरांचे लसीकरण सुरू केले असले तरी दैनदिन आकडेवारीत लम्पीग्रस्तांची संख्या वाढतांना दिसत आहे. शनिवारी एकाच दिवसात पाच गायी दगावल्या आहेत. जिल्ह्यातील 711 गावे हे लम्पी रोगाच्या संपर्काच्या पाच किलो मीटरच्या परिघात येत असून याठिकाणी तातडीने सर्व जनावंराचे लसीकरण करण्यात येणार आहे. या गावातील 7 लाख 83 हजार जनावरांचे लसीकरण करण्यात येणार असून आतापर्यंत पशूसंवर्धन विभागाने 3 लाख 75 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण केले आहे. तर तालुका पातळीवर 6 लाख 86 हजार लम्पी विरोधी लस पोहच करण्यात आली आहे.

राज्यातील पहिले जनावरांचे क्वारंटाईन सेंटर पाथर्डीत

कोविडप्रमाणे लम्पी रोगाचा मुकाबला करण्यासाठी जनावरांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. याबाबत राज्य पातळीवरून सुचना आले असून नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात राज्यातील जनावरांचे क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगावच्या बळीराजा फांऊडेशनने बळीराजा लंपी क्वारंटाईन सेंटर सुरू केले आहे. याठिकाणी लम्पी बाधित जनावरांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या