Tuesday, April 1, 2025
Homeब्रेकिंग न्यूजलक्झरी बस दरीत कोसळली; दोन जणांचा मृत्यू

लक्झरी बस दरीत कोसळली; दोन जणांचा मृत्यू

सापुतारा | वार्ताहर

- Advertisement -

सापुतारा घाटात खासगी बस दरीत कोसळून प्राथमिक माहितीत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये 60 प्रवासी होते.

सुरत येथील चौक बाजार-उधना येथील बापा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस क्र. (जीजे 05 बी. टी. 9393) सापुतारा येथे गेली होती. बस प्रवाशांसह सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरून जात होती. सायंकाळी सहाच्या सुमारास घाटात वळण घेत असताना लक्झरी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटून बस संरक्षक भिंतीला धडकून दरीत कोसळली. अपघाताचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

ही घटना समजताच सापुताराचे पी.एस.आय. भोया घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी सापुतारा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : रेडीरेकनेर दरात वाढघरे-मालमत्ता महागली

0
मुंबई | Mumbai आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारने रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणार्‍यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात 5.95%...