Sunday, June 8, 2025
Homeनाशिक'मधावानी गोड' गाण्याचे अमिताभ बच्चन यांच्याकडून लॉंचिंग

‘मधावानी गोड’ गाण्याचे अमिताभ बच्चन यांच्याकडून लॉंचिंग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

अभिनेत्री तमन्ना बांदेकर यांच्या ‘मधावानी गोड’ या गाण्याचे लॉंचिंग बुधवार दि.२७ सप्टेंबर रोजी दुपारी ४:३० वाजता SSK सोलीटीयर या हॅाटेलमध्ये पार पडले, अशी माहिती गाण्याचे सादरकर्ते पार्थसारथी राजेंद्र चव्हाण यांनी तसेच एम डी आर ॲन्ड सन्स फिल्मस यांनी दिली..

गाण्याचे दिग्दर्शन सुराज कुटे यांनी केले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि शहरातील परीसरात या गाण्याचे चित्रीकरण झाले आहे. या गाण्याचे संगीत विकी अडसुले यांचे असून निलेश धुमाळ आणि विकी अडसुळे यांनी या गीताची रचना केली आहे.

शहरविकासात राजकीय इच्छाशक्ती अपुरी

गायिका सोनाली सोनावणे आणि गायक अनुराग गोडबोले यांच्या आवाजात हे गाणे तयार झाले आहे. गाण्याचे लॅांचिंग अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मुंबई येथे नुकतेच करण्यात आले आहे. यावेळी अभिनेत्री तमन्ना, दिग्दर्शक सुराज आणि सादरकर्ते पार्थसारथी हे उपस्थित होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात, जोडप्याचा मृत्यू

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : …अन् विखुरलेली भिंत झाली बोलकी; ‘सीपी व्हाट्सॲप’वर ज्येष्ठ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik मद्यपि कारचालकांकडून संरक्षक भिंतीचे नुकसान आणि कारमधील तरूणांकडून दमदाटी याबाबत एक ज्येष्ठ महिलेने शहर पोलीस आयुक्तांच्या (CP Police Commissioner) 'सीपी...