Tuesday, March 25, 2025
Homeनगरमध्यप्रदेशातून शेवगावात गांजा विक्रीसाठी आणणारे दोघे जेरबंद

मध्यप्रदेशातून शेवगावात गांजा विक्रीसाठी आणणारे दोघे जेरबंद

30 लाखांचा मुद्देमाल जप्त || स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हातगाव (ता. शेवगाव) शिवारात मोठी कारवाई करत गांजा व अन्य मुद्देमालासह 29 लाख 64 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून, एक जण पसार आहे. तिघांविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अनिल बाबासाहेब बडे (वय 34) व बाबासाहेब धनाजी बडे (वय 70 दोघे रा. हातगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मोतीराम (पूर्ण नाव माहिती नाही, रा. मध्यप्रदेश) हा पसार झाला आहे. दरम्यान, सदरचा गांजा मध्यप्रदेश येथून अहिल्यानगर जिल्ह्यात विक्रीसाठी येत असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येत आहे. हातगाव शिवारातील बाबासाहेब धनाजी बडे व अनिल बाबासाहेब बडे यांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्रीसाठी आणले आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, गणेश लोंढे, संतोष खैरे, विशाल तनपुरे, शिवाजी ढाकणे यांनी शेवगाव पोलीस ठाण्याच्या पथकासोबत 5 मार्च रोजी हातगाव येथे धाड टाकली असता, एकूण 66.710 किलो वजनाचा गांजा, दोन मोबाईल, दोन कार असा एकूण 29 लाख 64 हजार 200 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संशयित आरोपी अनिल बडे याच्याकडे चौकशी केली असता, हा गांजा मध्यप्रदेशातील मोतीराम (पूर्ण नाव माहिती नाही) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाली. तो आणि त्याचे वडील बाबासाहेब बडे मिळून हा गांजा स्थानिक परिसरात विकत होते, असेही तपासातून समोर आले आहे.

गोठ्यात गांजाचा साठा
बाबासाहेब बडे याच्या जनावरांच्या गोठ्यात एका खोलीत मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवला असल्याचे पोलिसांना आढळले. झडतीदरम्यान दोन्ही संशयित आरोपी मिळून आले. त्यांची ओळख पटवून पंचासमक्ष घर आणि घरासमोरील दोन कारची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा मिळून आला असून तो पोलिसांनी जप्त केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...