नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने आर. प्रज्ञानंदचा पराभव केला आहे. आर. प्रज्ञानंद इतिहास रचता रचता राहिला आहे. दोन डाव अनिर्णित राहिल्यानंतर टायब्रेकर डावात मॅग्नस कार्लसन प्रज्ञानंदला पराभूत करत वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे…
मॅग्नस कार्लसन अन्नातून विषबाधा झाल्याने अस्वस्थ होता. मात्र त्या स्थितीतही त्याने आर. प्रज्ञानंदला चांगली झुंज दिली. आर. प्रज्ञानंदचा पराभव झाला असला तरी त्याने मॅग्नस कार्लसनला चांगलेच झुंजवले. अझरबैजानच्या बाकू येथे हा सामना पार पडला.
UWW vs WFI : जागतिक कुस्ती महासंघाचा दणका! भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द
याआधी झालेले दोन्ही डाव अनिर्णित राहिले होते. मंगळवारी पहिला डाव झटपट बरोबरीत सोडवला गेला होता. प्रज्ञानंदने कार्लसनला 35 चालीतच डाव बरोबरीत सोडविण्यास भाग पाडले होते. तर दुसरा डावही अनिर्णित राहिला होता. 30 चालीनंतर दोघांनीही बरोबरी साधली होती. यानंतर आज सामना पार पडला आणि टायब्रेकर डावात निर्णय झाला.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
एकापाठोपाठ कोसळल्या सात इमारती; अंगाचा थरकाप उडविणारा Video आला समोर