नागपूर |
कालपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि इतर वाहनांतून नागपूरमध्ये महाएल्गार मोर्चा काढण्यात आला आहे. बच्चू कडू यांनी आठ मागण्या राज्य सरकारकडे केलेल्या आहेत. कालपासून हे आंदोलन सुरु आहे.या आंदोलनामुळे नागपूरमधील वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे.
आज रात्री सरकारचे सरकारचे शिष्ट मंडळ बच्चू कडू यांची आंदोलन स्थळी भेट घेण्यास रवाना झाले. मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जैसवाल यांचा यात समावेश आहे. चर्चे दरम्यान आंदोलकांकडून ‘मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार का ‘? या मुद्द्यावर प्रथम बोला, अथवा मुख्यमंत्री यांचे सोबत बोलून बोलून सांगावे अशी मागणी करण्यात आली होती .
दरम्यान सरकारचे शिष्ट मंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांचे बरोबर फोनवर चर्चा केल्या नंतर शिष्टमंडळाने पुन्हा बच्चू कडू यांचे सोबत चर्चा केली. दरम्यान बच्चू कडू म्हणतील तेव्हा सरकारची चर्चेची तयारी असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले आहे.
आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन न थांबवता बच्चू कडू उद्या मुख्यमंत्र्यांशी मुंबईत चर्चा करणार असल्याचे शिष्टमंडळास सांगण्यात आले आहे. मागण्यामान्य न झाल्यास , कर्ज माफीची तारीख न मिळाल्यास रेल्वे मार्गावर आंदोलन करणार असल्याचे बच्चू कडू यांचे कडून सांगण्यात आले आहे.




