Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या तोंडावर 'गद्दारांचा पंचनामा' प्रकाशित; महायुतीवर टीकेची...

Maharashtra Politics : महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या तोंडावर ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रकाशित; महायुतीवर टीकेची झोड

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज एक महत्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या कारभारावर ‘गद्दारांचा पंचनामा’ही पुस्तिका आणि चित्रफीत महाविकास आघाडीकडून प्रदर्शित करण्यात आली. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उबाठाचे प्रमुख उध्दव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मविआच्या तिन्ही नेत्यांनी महायुती सरकारच्या (Mahayuti Government) कामकाजावर जोरदार टीका केली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Raj Thackeray : ना आघाडी, ना युती…; विधानसभेसाठी राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, मेळाव्यात केली घोषणा

यावेळी बोलतांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की,”गद्दारांचा आम्ही पंचनामा केला आहे. अडीच वर्षात यांनी कसं सरकार चालवलं याचा पंचनामा यात करण्यात आला आहे. ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला तिचं लोकं आज सत्तेत आहेत. त्याच लोकांच्या भ्रष्टाचारामुळे शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही या घटनेची माफी मागितली नाही. काल तर बाबा सिद्धकी यांची हत्या करण्यात आली. सत्ताधारी पक्षातील नेते देखील सुरक्षित नाहीत. स्वतःच राजकारण कसं करायचं हेच यांच्या डोक्यात आहे”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Sanjay Raut on Baba Siddique : “गृहमंत्र्यांचा राजीनामा नको, आता त्यांना थेट…”; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर संजय राऊत फडणवीसांवर संतापले

पुढे ते म्हणाले की, “खोक्यांचे सरकार राज्यात आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या जखमेवर यांनी कायम मीठ चोळण्याचे काम केले. त्यामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहेत. तरुण शिकलेल्या मुलामुलींचे आयुष्य बरबाद करण्याचे काम हे सरकार करत आहे. महाराष्ट्राला पुन्हा गतवैभवत आणण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित या निवडणुकीत सामोरे जात आहोत. महाराष्ट्राची जनता या निमित्ताने जशी लोकसभेमध्ये आमच्या बाजूने उभी होती. तसेच महाविकास आघाडीच्या बरोबर येणाऱ्या विधानसभेतही जनता राहील अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्र वाचवणे आमचं काम असून या सरकारने महाराष्ट्राला काळिमा फासण्याचे काम केले आहे”, असेही नाना पटोलेंनी म्हटले.

हे देखील वाचा : बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात; आरोपींची नावे आली समोर

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, “ही गद्दारी फक्त सेना आणि राष्ट्रवादीसोबत झाली नाही, तर जनतेसोबत देखील झाली आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणावर बोलतांना ते म्हणाले, मुंबईला २ पोलीस कमिशनर आहेत, आणखी ५ वाढवा, हरकत नाही पण कारभाराचे काय ? गद्दारांना आणि त्याच्या कुटुंबियांना दिलेली सुरक्षा काढा आणि जनतेला द्या. हे सरकार आपल्या अंगाला काही लागू देत नाही. काही महिन्यांपूर्वी आमच्या घोसाळेकर यांचीही हत्या झाली.त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, कुत्रा गाडीखाली आला तर राजीनामा मागणार का? तुम्ही म्हणता कुत्र्याचा मृत्यू झाला तरी राजीनामा मागणार मग तुम्हाला जीवाची किंमत नाही का? तुम्ही जाहिरातबाजीवर पैसा उधळता तेवढा जनतेच्या सुरक्षेवर लावा. शाहू फुले आणि आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आम्ही मोदी शहांचा होऊ देणार नाही”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : बाबा सिद्दीकींची हत्या का आणि कशासाठी? धक्कादायक कारणं समोर

तसेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा (CM Face) कोण असेल, याबाबत उपस्थित पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर ठाकरेंनी महायुतीकडे बोट दाखवले. ते म्हणाले “महायुतीने त्यांचा चेहरा जाहीर केला की आम्ही करू. महायुतीमध्ये भाजपची एवढी दयनीय असवस्था झाली आहे की चोर आणि गद्दारांचे नेतृत्व मानावे लागत आहे. महायुतीने आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करू द्या, नंतर आम्ही करतो. आमच्याकडे खूप चेहरे आहेत”, असे ठाकरेंनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा : बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली

तर शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, “मी सतत महाराष्ट्रात फिरत असून माझे इतर सहकारी देखील फिरत आहेत. त्यामुळे माझं निरीक्षण असं आहे की लोकांना परिवर्तन हवं आहे. लोकसभेच्या निकालाआधी कोणी मान्य करत नव्हतं. पण निकाल आला,आम्ही ३१ जागा जिंकलो याचा अर्थ लोकांना बदल हवा होता. आताही विधानसभेत हा बदल होणार हे नक्की आहे,असे त्यांनी म्हटले. तसेच महिलांचा सन्मान करायचं ठरवलं तर आम्ही त्याचं समर्थन करतो. फक्त ही योजना कायमची आहे की तात्पुरती आहे हे सरकारने सांगावं. बजेट मांडला जातो. त्यातील एकही तरतूद बजेटमध्ये नाही. हा निवडणुकीसाठीचा उद्योग आहे”, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या