Sunday, November 3, 2024
Homeदेश विदेशBishnoi Gang-Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली

Bishnoi Gang-Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली

मुंबई । Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची त्यांच्याच ऑफिससमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वांद्रे येथील निर्मलनगर येथे शनिवारी रात्री त्यांच्यावर तीन आरोपींकडून सहा राऊंड फायर करण्यात आले.

- Advertisement -

यात त्यांचा मृत्यू झाला. हे तिघे आरोपी रिक्षातून आले आणि त्यांनी थेट सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिसांनी या तीनपैकी दोन आरोपींना अटक केली आहे. तर, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस अधित तपास करत असून मोठे खुलासे सातत्याने होत आहेत.

याचदरम्यान बाबा सिद्दिकी याच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने (Bishnoi Gang) स्वीकारली असल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ही जबाबदारी या गँगने घेतली आहे.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये बिश्नोई गँगने म्हटलं की, ओम जय श्री राम, जय भारत, मला जीवनाचं सार समजतं आणि संपत्ती आणि शरीराला मी धूळ समजतो. मैत्रीच्या कर्तव्याचा सन्मान करत मी जे योग्य होतं तेच केले. सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होतं. पण तुझ्यामुळे आमच्या भावाला जीव गमवावा लागला. आज बाबा सिद्दीकी यांचा शालीनपणाचा सागर संपला आहे किंवा एकेकाळी त्याच्यावर दाऊदसोबत मकोका होता. त्याच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्याचे दाऊद आणि अनुज थापन यांच्यासोबत बॉलिवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहाराशी असलेले संबंध. आमचं कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. मात्र, सलमान खान किंवा दाऊद टोळीला मदत करणारा जो कोणी असेल त्याने तयार राहावे. जर कोणी आमच्या भावांना मारले तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ. आम्ही कधीच पहिला वार करत नाही. जय श्री राम, जय भारत, शहीदांना विनम्र अभिवादन.

बाबा सिद्दीकींवर हल्ला करणाऱ्यांपैकी दोघांची नावं काय?

तिघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. यातल्या दोन हल्लेखोरांची नावं समजली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करनैल सिंह हा हरियाणाचा राहणारा आहे आणि धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशातला राहणारा आहे. यांच्यास आणखी एक हल्लेखोर होता. जो फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आऱोपीची चौकशी सुरु आहे. बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी आरोपींना पैसे दिले गेले होते. तर काही दिवसांपूर्वी त्यांना हत्यारं पुरवण्यात आली होती. मुंबई पोलीस मागील आठ तासांपासून या हल्लेखोरांची कसून चौकशी करत आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील असं म्हटलं आहे. माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

२००४ ते २००८ या काळात ते विविध खात्यांचे राज्यमंत्री तसेच म्हाडाचेही अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?

पंजाबमधील फिरोजपूर12 फेब्रुवारी 1993 रोजी जन्मलेला लॉरेन्स बिश्नोईचा जन्म झाला. लॉरेन्सचे वडील 1992 मध्ये हरियाणा पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. मात्र पाच वर्षांनी नोकरी सोडून त्यांनी शेती सुरू केली. लॉरेन्सने पंजाब विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केले आहे. 2009 मध्ये शिक्षणादरम्यान तो पंजाब विद्यापीठाच्या एका विद्यार्थी संघटनेत सामील झाला. त्यादरम्यान त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष गोल्डी ब्रार याच्याशी भेट झाली.

गोल्डीला भेटल्यानंतर आणि विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणात सामील झाल्यानंतर बिष्णोईची पावले गुन्हेगारीच्या जगाकडे वळला. तो बेकायदेशीर कामात अडकू लागला. जवळपास दोन दशकांनंतर, लॉरेन्स बिश्नोई हा एक गुन्हेगारी जगतातला चेहरा म्हणून ओळखला जाऊ लागला. लॉरेन्स बिश्नोईच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्था आणि दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. लॉरेन्स सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगातील तुरुंग क्रमांक 8 मधील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये कैद आहे. लॉरेन्स बिश्नोईवर खून आणि खंडणीचे दोन डझन गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या