मुंबई । Mumbai
लोकसभा निवडणूक (Loksabha Election) संपताच महाराष्ट्रात चर्चा आहे ती विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election)… लोकसभेच्या निकालानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचा मोर्चा हा विधानसभा निवडणुकीकडे वळाला आहे. लोकसभा निवडणूक एकत्र लढवून राज्यात चांगली कामगिरी करणाऱ्या मविआने (MahaVikasAghadi) आता विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चाचपणी सुरू केली आहे.
नुकतंच मुंबईतील (Mumbai) वायबी चव्हाण सेंटरमध्ये (YB Chavan Centre) मविआची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली होती. मविआ एकजुटीने विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान मविआच्या पत्रकार परिषदेपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
हे देखील वाचा : “पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर..”; शरद पवारांचे CM शिंदेंना पत्र
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसने (Congress) १७ जागा लढवल्या होत्या, त्यातील १३ उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena Ubt) ९, राष्ट्रवादी शरद पवार गटाला (NCP Sharadchandra Pawar) ८ जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कामगिरी पाहता काँग्रेसला विधानसभेत सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. (Maha Vikas Aghadi Seat Sharing formula)
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा असून काँग्रेस १०० ते १०५ जागांवर लढण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गट ९० ते ९५ जागांवर आणि शरद पवार गट ८० ते ८५ जागा लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये काँग्रेसची ताकद आहे.
हे देखील वाचा : पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; सिग्नलची वाट पाहत असलेल्या एक्स्प्रेसला मालगाडीची धडक
तिथे काँग्रेसला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबई, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी ठाकरेंच्या सेनेची ताकद आहे. तर, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बळ आहे. त्यामुळे तेथील जागा ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाला मिळू शकतात.