Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमहायुतीला मोठा धक्का! महादेव जानकरांची सोडचिठ्ठी; विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा

महायुतीला मोठा धक्का! महादेव जानकरांची सोडचिठ्ठी; विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा

मुंबई | Mumbai

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) काल महाराष्ट्रातील (Maharashtra) विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) येत्या एक ते दोन दिवसांत जागावाटप होण्याची शक्यता आहे. पंरतु, या जागावाटपात मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळत नसल्याने ते दोन्ही आघाड्यांत नाराज असल्याची चर्चा आहे . यामुळे काही मित्रपक्षांनी स्वबळाची चाचपणी सुरु केली आहे. अशातच आता महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या रसपने युतीमधून बाहेर पडत विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Mahayuti Press Conference : महायुतीचे ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित; कुठे केली गुंतवणूक, कोणती कामे केली?

याबाबतची घोषणा स्वत: राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Party) अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केली आहे. ते म्हणाले की, महायुतीकडे विधानसभेसाठी त्यांनी ४० ते ५० जागांची मागणी केली होती. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळेच आता महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रीय समाज पक्ष आता राज्यात सर्व जागा स्वबळावर लढणार आहे, असे जानकरांनी म्हटले.

हे देखील वाचा : Mahayuti Press Conference : “… तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार”; महायुतीच्या नेत्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

महादेव जानकरांनी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) ही महायुतीच्या (Mahayuti) माध्यमातून लढवली होती. मात्र परभणीतून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभेला आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जानकर प्रयत्नशील होते. पण त्यांना अपेक्षित जागा मिळणार नाही असं लक्षात येताच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपल्याशी महायुती किंवा महाविकास आघाडीने संपर्क साधला नसून पक्षाच्या वाढीसाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे म्हणत महाराष्ट्रात २८८ जागा लढवण्यासाठी तयारी करत आहोत असे जानकरांनी सांगितले.

हे देखील वाचा : मुंबईतील लोखंडवाला येथील बहुमजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू

दरम्यान, महादेव जानकरांनी परभणीतून (Parbhani) महायुतीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या (Ajit Pawar NCP) कोट्यातून ही जागा मिळाली होती. मात्र, परभणीतून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर विधानसभेला आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जानकर प्रयत्नशील होते. पण त्यांना अपेक्षित जागा मिळणार नाही असे लक्षात येताच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...