मुंबई । Mumbai
महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी (CNG) आणि घरगुती (PNG) पीएनजीच्या किंमतीत वाढ केली असून नवे दर आजपासून लागू झाले आहेत. ‘सीएनजी’ प्रति किलो दीड रुपयांनी, तर ‘पीएनजी’ एक रुपयाने महाग झाला आहे.
सीएनजी आणि पीएनजी यांची मागणी वाढत आहे, तर पुरवठा कमी आहे. त्यामुळे कंपनीकडून ज्यादा बाजारभावाने नैसर्गिक वायू खरेदी केला जात आहे. त्यामुळे सीएनची आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ केल्याचे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
हे देखील वाचा : मुसळधार पावसाचा फटका आमदार आणि मंत्र्यांनाही; मंत्री अनिल पाटील, मिटकरी ट्रॅकवर
आता ग्राहकांना एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये आणि पीएनजीसाठी ४८ रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्लीत इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने २२ जून रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये वाढ केली होती.
मुंबईकर रेल्वे आणि बसनंतर प्रवास करण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सीचा सर्वाधिक वापर करतात. शहर आणि उपनगरात सीएनजीवर आधारित हजारो रिक्षा आणि टॅक्सी चालतात. मात्र, सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे.
व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा