Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik Constituency 2024 : महंत अनिकेत शास्त्री नाशिक लोकसभेच्या रिंगणात

Nashik Constituency 2024 : महंत अनिकेत शास्त्री नाशिक लोकसभेच्या रिंगणात

भाजपकडून निवडणूक लढवत असल्याचा केला दावा

नाशिक | Nashik

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघ (Nashik Constituency) विविध राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आला आहे. सुरुवातीपासून या मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) दावा करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्ष असणाऱ्या भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटाने देखील दावा केला आहे. त्यामुळे महायुतीला नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात उशीर होत असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या (NCP) कोट्यातून नाशिकच्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. पंरतु, महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यास उशीर होत असल्याचे कारण देत त्यांनी काही दिवसांपूर्वी निवडणुकीतून माघार घेतली. मात्र, या मतदारसंघावर पक्षाचा दावा कायम असल्याचे म्हटले. दुसरीकडे भाजपने देखील या मतदारसंघात आपले आमदार आणि नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने दावा केला आहे. त्यातच कालपासून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी तब्बल नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी १२८ अर्जांची विक्री झाली आहे. तर ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

यात प्रामुख्याने नाशिकसाठी १००८ महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच दिंडोरीसाठी माकपचे माजी आमदार जे पी गावित आणि सुभाष चौधरी यांनी अर्ज दाखल केला आहे. तर नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर, माजी महापौर दशरथ पाटील, माजी स्थायी सभापती दिनकर पाटील, स्वामी सिध्देश्वरानंद सरस्वती यांच्यासह ८७ इच्छुकांनी पहिल्याच दिवशी नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज नेले आहेत. अशातच आता नाशिक लोकसभा निवडणुकीत आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे.

नाशिक लोकसभेच्या रिंगणात महंत अनिकेत शास्त्री (Mahant Aniket Shashri) हे देखील उतरले असून त्यांनी भाजपकडून (BJP) निवडणूक (Election) लढवत असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी अर्ज भरण्यास सांगितल्याचे महंत अनिकेत शास्त्री यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुतीमधील नाशिकच्या जागेचा तिढा कायम असतानाच आता महंत अनिकेत शास्त्री यांच्या दाव्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. यामुळे महायुतीमधील नाशिक लोकसभेचा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या