Monday, July 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूजराज्याचा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; यंदाही मुलींची बाजी

राज्याचा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; यंदाही मुलींची बाजी

नाशिक विभागाचा निकाल किती टक्के?

पुणे | Pune

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल (SSC Result) आज जाहीर करण्यात आला आहे. त्यात राज्याचा दहावीचा यंदाचा एकूण निकाल ९५.८१ टक्के इतका लागला आहे.

यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागाने (Kokan Divison) बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ९४.७३ टक्के लागला आहे. तसेच राज्यात निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल ९७.२१ टक्के तर मुलांचा निकाल ९४.५६ टक्के लागला आहे.

दरम्यान, एकूण १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ९४.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाली असून, ९७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षी ९३.८३ टक्के निकाल लागला होता. गेल्यावर्षी राज्यातील १०८ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले होते.

नाशिक विभागाचा निकाल ९५.२८ टक्के

नाशिक विभागात १ लाख ९७ हजार २३६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यात १ लाख ९५ हजार ५८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात १ लाख ८६ हजार ३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाशिक जिल्ह्यात ९१ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ९१ हजार ४१४ जणांनी परीक्षा दिली. त्यातील ८७ हजार ५६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.नाशिक जिल्ह्याचा निकाल ९५.७९ टक्के लागला. विभागीय अध्यक्ष बी बी चव्हाण व सचिव एम एस देसले यांनी निकालाची माहिती दिली. तसेच ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका पडताळणीसाठी सादर करायच्या आहेत त्यांनी २८ मे ते १८ जून या कालावधीत उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

विभागनिहाय निकाल (टक्केवारी)
पुणे – ९६.४४ टक्के
नागपूर – ९४.७३ टक्के
छत्रपती संभाजीनगर – ९५.१९ टक्के
मुंबई – ९५.८३ टक्के
कोल्हापूर – ९७. ४५ टक्के
अमरावती – ९५.५८ टक्के
नाशिक – ९५.२८ टक्के
लातूर – ९५.२७ टक्के
कोकण – ९९. ०१ टक्के

विद्यार्थ्यानो निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

https://results.targetpublications.org

- Advertisment -

ताज्या बातम्या