Thursday, November 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Election 2024 : कळवण- सुरगाणा मतदार संघात 74. 63 टक्के...

Maharashtra Assembly Election 2024 : कळवण- सुरगाणा मतदार संघात 74. 63 टक्के मतदान

मानूर । वार्ताहर Manur

कळवण – सुरगाणा विधानसभा मतदार संघात विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण 74. 63 टक्के इतके मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिली.

- Advertisement -

मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. कळवण सुरगाणा मतदार संघात एकूण मतदारांची संख्या तीन लाख एक हजार नऊशे शहाण्यव इतकी असून त्यापैकी पुरुष मतदार एक लाख बाव्वन हजार सहाशे सदोतीस तर महिला मतदार एक लाख एकोणपन्नास हजार तीनशे एकोणसाठ इतकी आहे. त्यात तालुक्यात काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले.

संपूर्ण राज्यासह कळवण सुरगाणा मतदार संघात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. सकाळपासूनच सर्व मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या बघावयास मिळत होत्या. विशेषतः महिला वर्गाचा मतदानासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कळवण – सुरगाणा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने मतदार संघात सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली.

मतदारांने उत्साहात येऊन मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. दुपारच्या वेळेत सुद्धा भर उन्हात मतदारांनी आपला हक्क बजावीला.मतदान करण्यासाठी अबालवृद्ध तसेच महिला भगिनींनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. मतदान करणार्‍यांची संख्या वाढल्याने मतदार संघात 74.63 टक्केच्या आसपास मतदान झाल्याची माहिती संहाय्यक उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अकुनरी नरेश यांनी दिली.

कळवण शहरात साधारण 71.50 टक्के मतदान झाले तर तालुक्यात ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी वाढल्याचे चित्र आहे. सात उमेदवार ह्या मतदार संघात उमेदवारी करत होते मात्र प्रामुख्याने लढत हि विद्यमान आमदार नितीन पवार व माजी आमदार जे. पी. गावित यांच्यात होती. काट्याची लढाई झालेल्या या निवडणुकीत कोणाचा विजय होईल याचे आराखडे समर्थक बांधत असून मतदारांना निकालाची उत्सुकता लागून आहे. 23 तारखेला कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते याकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागून आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या