Monday, November 25, 2024
HomeराजकीयAjit Pawar : "लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला खुश करा"; अजित...

Ajit Pawar : “लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला खुश करा”; अजित पवारांचे बारामतीकरांना आवाहन

बारामती | Baramati

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सध्या बारामती (Baramati) दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर आज अजित पवार सकाळी सात वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत बारामती तालुक्यातील २७ गावांना भेटी देणार आहेत. यात आज बारामतीमधील सावळ या गावाला अजित पवारांनी भेट दिली असता त्यांनी उपस्थित स्थानिक नागरिकांना ‘लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला पण खुश करा’ असे म्हणत भावनिक आवाहन केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : “…तर तुमचा बाबा सिद्दिकी करू”; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीच्या (Loksabha Election) निमित्ताने तुमच्या मनात काय होतं ते तुम्ही बोलत नव्हता पण तुमच्या तुमच्या मधला अंदाज कळत होता. काही लोक म्हणायचे साहेब वडीलधारे आहेत. सुप्रियाताई पडल्या तर साहेबांना कसं वाटेल त्यामुळे आपण ताईला मतदान (Voting) करू. त्यानुसार तुम्ही मतदान देखील केलं ते मी स्वीकारलं. त्यामुळे आता विधानसभेला तुम्ही मला मतदान करा. लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला पण खुश करा. साहेब साहेबांच्या परीने विकास करतील मी माझ्या पध्दतीने तालुक्याचा विकास करेल असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Maharashtra News : निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पैशांचा महापूर; नाशिक, कसारा घाटात नाकेबंदीत दोन कोटी ३१ लाखांची रोकड हस्तगत

पुढे बोलतांना ते म्हणाले की, बारामतीत हजारो कोटी रुपयांची कामे चालू आहेत. आरोग्य बाबतीत बारामतीत अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. २ कोटी ३० लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले आहेत. हे पैसे थेट खात्यात जमा होत असल्याने भ्रष्टाचार होणार नाही. बारामतीत १ लाख २१ हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. ही योजना सुरू ठेवायची असेल तर महायुतीचे सरकार (Mahayuti Government) आणावे लागेल. गरीब वर्गाची चांगली परिस्थिती करण्यासाठी योजना सुरू केली असून आता यापुढे वीज ही सौरऊर्जा पध्दतीने देणार आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या