Thursday, November 21, 2024
HomeनाशिकNashik Political : आम्ही राजीनामे देऊ; काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

Nashik Political : आम्ही राजीनामे देऊ; काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

नाशिक | भारत पगारे

यंदाची विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) नेमकी कोणत्या ‘रुट’वरुन जात आहे हे प्रत्येकाला कळायला अवघड जात आहे. आयपीएल (IPL) आणि टेंटी-टेंटी क्रिकेट अनेकांना कळत नाही, तसाच काहीसा फिल या निवडणुकीत अनेकांना येतो आहे. कोण कोणत्या टीममध्ये आहे, बॉल कोण फेकत आहे, टीममध्ये कोण प्लेअर आहे, कोणत्या टीमचा कुणाशी सामना आहे हे समजण्यात जसा वेळ जातो, तसेच या निवडणुकीसाठी कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतोय, घातलेले उपरणे डबड्यात टाकून नवीन पक्षाचा (Party) ‘कलरफूल’ पट्टा गळ्यात बांधून घेतो आहे, कोण कुठून येतय, जातेय, हे कळायला अवघड होत आहे. हे सर्व होत असतानाच आता नाशिकच्या ‘मध्य’ विधानसभा मतदार संघाच्या परंपरागत जागेसाठी स्वपक्षियांनीच ‘राजीनामास्र’उपसले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक पश्चिमची लढत विविधरंगी; प्रबळ दावेदारांमुळे उमेदवारांचा लागणार कस

काँग्रेसींच्या (Congress) या मध्य मतदारसंघावर (Central Constituency) हक्क सांगतानाची ही धमकी (प्रेसनोट) वाचल्यानंतर ज्याने त्याने आकलन करावे, नाही केलेतरी आम्हाला काय सांगणे नाही. काँग्रेसी पदाधिकाऱ्यांच्या प्रेसनोटनुसार ‘नाशिक शहरामध्ये विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत, त्यापैकी नाशिक मध्य हा काँग्रेस पक्षाचा परंपरागत मतदारसंघ आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास शेवटच्या क्षणी उमेदवारी दिल्यानंतर देखील त्यांना ४७ हजार मते मिळाली होती. या परिस्थितीत, नाशिक मध्य मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या ताब्यात असली पाहिजे, अशी भावना सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य मतदारांची आहे. मात्र, जागावाटप प्रक्रियेत हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिल्याचे समजते.

हे देखील वाचा : मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; निफाड, पारनेरचा उमेदवार ठरला

नाशिक शहरामधील (Nashik City) एकही मतदारसंघ काँग्रेसला मिळाला नसल्याने आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा ‘पंजा’ ही निशाणी घराघरांत कशी पोहोचवायची, हा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा आहे. या कारणास्तव कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याच उद्वेगातून आम्ही दोन दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यालयाला टाळे ठोकले आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर २०२४ असल्यामुळे, ही जागा काँग्रेसच्या ताब्यात घेऊन काँग्रेस उमेदवारास उमेदवारी द्यावी, अशी आमची सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. जर ही जागा त्यांना मिळाली नाही, तर आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्या पदांचा राजीनामा देऊ, पक्षश्रेष्ठींकडून आशा आहे की आज (दि. २६) रविवारपर्यंत ही जागा काँग्रेस उमेदवारास दिली जाईल आणि त्यांना एबी फॉर्म देण्यात येईल, असे या प्रेसनोटमध्ये सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकत्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : न्यायाची मागणी करणाऱ्या जयश्री थोरातांवरच गुन्हा दाखल!

वास्तविक ही प्रेसनोट नसून धमकीवजा ‘सामूहिक राजीनामापत्र’ आहे, कोणीही सांगेल. पण, आता निवडणूक आहे, आचारसंहिता आहे. कोण काय बोलणार? कारण, महायुती आणि महाविकास आघाडीचे वैर इतके टोकाला जात आहे, की ‘एक्स’वर (द्विटर) भाजप (BJP) काँग्रेस, वंचित, राष्ट्रवादी (दोन्ही), शिवसेना (दोन्ही गट), नास्तिक, आस्तिक अकाउंटधारक एकमेकांची पातळी सोडून सर्वच प्रकारची टिकाटिप्पणी करत आहेत. सोशल मीडियावरील या घटकांवर वेळीच नियंत्रण मिळविलेच तरच विधानसभा निवडणुका शांततेत पार पडू शकतील. तसे पाहिले तर, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी राजकारणाचा अक्षरशः कचरा केला आहे. समीकरणे जुळवताना केलेली उमेदवारांची फाटाफूट विविध पक्षांना मारक ठरणार आहे. कारण अनेक पक्ष, मित्र पक्षांनी केलेला फाजीलपणा अनेकांना नडणार असून पक्षांतर्गत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा रोष वाढत चालला आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : निफाडमध्ये उमेदवार कोण?

मध्यची जागा काँग्रेसची

नाशिक शहरातील तीनपैकी नाशिक मध्य हा काँग्रेस पक्षाचा परंपरागत मतदारसंघ आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने मला शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली तरी ४७ हजार मते मिळवली होती. या परिस्थितीत मध्यची जागा काँग्रेसच्या ताब्यात असली पाहिजे, अशी भावना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची असून पक्षाकडून निरीक्षकांनी घरी येऊन उद्यापर्यंत निरोप येणार असल्याचे सांगितल्याचा दावा असला तरी उमेदवारी न मिळाल्यास मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत इच्छुक डॉ. हेमलता पाटील यांनी दिले.

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपची दुसरी यादी जाहीर; ‘नाशिक मध्य’चा उमेदवार ठरला

सानपांचा सपोर्ट कुणाला?

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक पूर्वच्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार सोडून महाविकास आघाडीत एकवाच्यता नव्हती. अखेर महाविकास आघाडीत एकमत झाले असून भाजपचे गणेश गिते यांना गळाला लावण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला यश आले आहे. गिते यांनी पूर्वमधून तुतारी फुंकली आहे. त्यांना ही उमेदवारी मिळाल्याने आता भाजपच्या ढिकलेसमोर गितेंचे तगडे आव्हान असणार आहे. त्यामुळे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप कुणाला सपोर्ट करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या