Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; निफाड, पारनेरचा उमेदवार ठरला

मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; निफाड, पारनेरचा उमेदवार ठरला

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडी आणि महायुती (Mahavikas Aagahdi and Mahayuti) यांच्यातील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मात्र, दोन्ही युती-आघाड्यांतील घटक पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. अशातच आज महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (Ajit Pawar NCP) उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunit Tatkare) यांनी ही यादी घोषित केली असून यादीत चार नांवाचा समावेश आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक पश्चिमची लढत विविधरंगी; प्रबळ दावेदारांमुळे उमेदवारांचा लागणार कस

या यादीनुसार नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) निफाड विधानसभा मतदारसंघातून (Niphad Assembly Constituency) विद्यमान आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवर भाजपचे यतीन कदम यांनी देखील दावा सांगितला होता. तसेच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांची भेट देखील घेतली होती. मात्र, अखेर महायुतीकडून बनकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

हे देखील वाचा : Nashik Political : निफाडमध्ये उमेदवार कोण?

तर फलटणमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सचिन पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. याशिवाय गेवराईतून विजयसिंह पंडित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच पारनेर विधानसभा मतदारसंघातून (Parner Assembly Constituency) काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचा सामना खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके (Rani Lanke) यांच्याशी होणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...