Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रJitendra Awhad : "... ही पाकीटमारांची टोळी"; जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रवादीवर निशाणा

Jitendra Awhad : “… ही पाकीटमारांची टोळी”; जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रवादीवर निशाणा

मुंबई | Mumbai

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु असून प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांकडून (Candidate) प्रचार सुरु करण्यात आला आहे. या प्रचाराच्या धामधुमीत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकाटिप्पणी करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांसह राष्ट्रवादीवर (NCP) निशाणा साधला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : “…तर तुमचा बाबा सिद्दिकी करू”; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

यावेळी बोलतांना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आहे? एक दिवस अजित पवार (Ajit Pawar) आले आणि शरद पवार यांना धक्का मारून बाहेर काढलं.जाताजाता त्यांच्या हातातले घड्याळही घेऊन गेले.ही पाकीटमारांची टोळी आहे. मर्दाची औलाद असते तर म्हणाले असते की, शरद पवार यांनी तुतारी निशाणी घेतली, मी सुद्धा एखादं वेगळं चिन्ह घेतो. असे केले असते तर मानले असते की, तुम्ही मर्दाची औलाद आहात, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Ajit Pawar : “लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला खुश करा”; अजित पवारांचे बारामतीकरांना आवाहन

तसेच “शरद पवार (Sharad Pawar) मोदींसमोर झुकले नाही, शरद पवार आमच्यासमोर म्हणाले होते की, तुम्हाला जायचं असेल तर जा, मी एकटा राहिलो तर चालेल. मी तरुणांमधून पुन्हा नेतृत्व तयार करेल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. यानंतर आता अजित पवार यांच्या पक्षाकडूनही जितेंद्र आव्हाड यांच्यावर पलटवार करण्यास सुरूवात झाली आहे.

हे देखील वाचा : Maharashtra News : निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पैशांचा महापूर; नाशिक, कसारा घाटात नाकेबंदीत दोन कोटी ३१ लाखांची रोकड हस्तगत

दरम्यान यावेळी बोलतांना राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जितेंद्र आव्हाड यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, “जे लोक २५-३० वर्ष तुमच्यासोबत राहिले, तुम्ही जे बोललेत ते त्या सर्वांना लागू होतं. जितेंद्र आव्हाड यांच्यावर जसा शरद पवार यांचा हात आहे तस छगन भुजबळ यांचाही आहे हे त्यांना माहिती आहे. तसेच पक्ष आणि चिन्ह हे आता नियमानुसार अजित पवार यांना मिळालं आहे असेही भुजबळांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या