Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Election 2024 : राजकीय पक्षांचा अपक्ष उमेदवारांकडे मोर्चा

Maharashtra Assembly Election 2024 : राजकीय पक्षांचा अपक्ष उमेदवारांकडे मोर्चा

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) आपल्याच पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या विविध राजकीय पक्षांनी ( Political Parties) बुधवारी मतदानाची (Voting) प्रक्रिया पार पडल्यानंतर आता त्यांचे लक्ष राज्यात कसे सरकार स्थापन करता येईल याकडे वळवले आहे. राज्यात झालेल्या एकूणच मदानानंतर कोणत्याही एका पक्षाला सहज एकहातील सत्ता मिळेल अशी सध्या तरी परिस्थिती  नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा १४५ चा जादुई आकडा गाठण्यासाठी अपक्षांची मदत लागणार असून निकाल लागाच्या आधीच राज्यातील राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी  त्यांचा मोर्चा निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांकडे  वळवल्याचे खात्रिलायकरित्या समजते.

- Advertisement -

राज्यात गेला महिनाभर महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) विरोधात महायुती (Mahayuti) असा सामना रंगला होता. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेले वातावरण विधानसभा निवडणुकीत मात्र काहीसे बदलले होते. लोकसभा निवडणुकीत तळागाळापर्यर्त झिरपलेला संविधानाचा मुद्या नंतर विधानसभा निवडणुकीसाठ तसा फारसा उपपयोगाचा नसल्याने त्या मुद्यावर निवडणूक लढविण्यावर महाविकास आघाडीला बरीच मर्यादा आलेली दिसली. राज्यातील सत्ताधारी महायुतीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणून विरोधकांना काहीसे अडचणीत आणले. निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांकडेही फारसे आक्रमक मुद्दे नसल्याने महागाई, भ्रष्टाचार, बटेंगे तो कटेंगे तसेच व्होट जिहाद यासारखे मुद्दे थोड्याफार प्रमाणात चालले. या सर्वपार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत महायुती वा महाआघाडी यांना जोरदार बहुमत मिळेल अशी सध्या तरी परिस्थिती नाही. दोन्ही आघाड्यांना राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी अपक्ष आमदारांची गरज भासणार असल्याचे मत राजकीय निरिक्षक नोंदवत आहेत. त्यातूनही जी आघाडी बहुमताच्या जवळ पोहोचेल त्यांना त्यांना पुढची पाच वर्षे स्थीर सरकार देण्यासाठी निश्चितच अपक्षांची फौज सोबतील लागणार आहे.

विधानसभेचा एकदा निकाल (Result) लागला आणि अपक्षांची सरकार बनविण्यासाठी महत्त्वाची भूमिका असेल नसे निश्चित झाले की साहजिकच अपक्षांचा भाव वधारणार आहे. अशावेळी त्यांची मर्जी वळविण्यासाठी तारेवरची कसरत करण्यापेक्षा कोणते अपक्ष आमदार निश्चित निवडून येतील याचा अंदाज बांधत बुधवारपासूनच राजकीय पक्षांचे लोक या अपक्षांना आपल्याकडे वळविण्याच्या कामात व्यस्त झाल्याचे समजते. काही राजकीय पक्षांनी तर मतदानाच्या आधीपासूनच याबाबतचा अंदाज बांधत काही जणांना रसद पुरवल्याचे समजते. सोलापूर दक्षिणमध्ये धर्मराज काडाबी, अक्कलकुवामध्ये हिना गावित, रामटेक मध्ये राजेंद्र मुळक, बडनेरामध्ये प्रिती बंड, सांगलीमध्ये जयश्री पाटील, इंदापूरमध्ये प्रविण माने, नांदगावमध्ये समीर भुजबळ अशा अनेक अपक्ष उमेवारांच्या संपर्कात राजकीय पक्ष असल्याचे समजते.

दरम्यान, यावेळेला राज्यात (State) जवळपास २० ते २२ अपक्ष आमदार निवडून येतील असा विविध राजकीय पक्षांचा आधीपासूनच व्होरा आहे. साहजिकच सत्तास्थापनेमध्ये यांचा मोठा वाटा असू शकतो हे गृहीत धरून आधीपासूनच अपक्षांना संपर्क साधण्याचा राजकीय पक्षांनी सुरूवात केली आहे. गुरूवारी काही अपक्षांना (Independent) मुंबईमध्ये बोलाविण्यात आल्याचेही समजते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...