Thursday, October 31, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Assembly Election 2024 : महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आला...

Maharashtra Assembly Election 2024 : महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आला समोर; पाहा कुणाच्या वाट्याला किती जागा?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) अर्ज दाखल करण्यासाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या (Mahayuti and Mahavikas Aaghadi) उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. युती-आघाडीत शेवटच्या क्षणापर्यंत काही जागांवरील तिढा न सुटल्याचे दिसून आले. यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी ५ ठिकाणी दोन उमेदवार दिले. तर महायुतीकडून अखेरच्या काही तासांपर्यंत उमेदवारी याद्या प्रसिद्ध करण्यात येत होत्या. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागावाटपाचा अंतिम आकडा समोर आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी; शिवसेनेने दिले राष्ट्रवादी विरोधात उमेदवार, पक्षाचे एबी फॉर्मही जोडले

ही आकडेवारी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील पक्षांकडून आलेली नसून जागावाटपानुसार (Seat Sharing) ठरविण्यात आलेल्या आकडेवारीवरून आहे. या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीतील काँग्रेसने (Congress) १०२, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (NCP Sharad Pawar) ९६ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shivsena UBT) ८७ जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. या तिन्ही पक्षांनी २८८ पैकी एकूण २८५ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर उर्वरित जागांवर मित्रपक्षांना संधी देण्यात आल्याचे समोर आले आहे.तर महायुतीमध्ये भाजपला १४८, शिवसेना (एकनाथ शिंदे) ८५ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ५१ जागा मिळाल्या आहेत. या तिन्ही पक्षांनी २८८ पैकी एकूण २८४ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर उर्वरित ४ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत.

हे देखील वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पाच उमेदवारांची यादी जाहीर; पंढरपूरात होणार मैत्रीपूर्ण लढत?

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये पाच विधानसभा मतदारसंघांत तीनपैकी दोन पक्षांचे उमेदवार (Candidate) देण्यात आले आहेत. यामध्ये मिरज, सांगोला, पंढरपूर, परांडा, दिग्रस या मतदारसंघांचा समावेश आहे. तर महायुतीमध्ये देखील काही मतदारसंघांमध्ये (Constituencies) तीनपैकी दोन पक्षांचे उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये बंडखोरी होते की मैत्रिपूर्ण लढत हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या