Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पाच उमेदवारांची यादी जाहीर; पंढरपूरात...

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पाच उमेदवारांची यादी जाहीर; पंढरपूरात होणार मैत्रीपूर्ण लढत?

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabah Election) अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज सर्वच पक्षांचे उमेदवार जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज (Application for Candidacy) भरणार आहेत. मात्र, राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचा अजूनही काही जागांवरील तिढा सुटलेला नसन तो दुपारपर्यंत सुटण्याची शक्यता आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (NCP Sharad Pawar) माढा मतदारसंघातून अभिजित पाटील,मोर्शीतून गिरीश कराळे, मुरुडमधून संगीता वाजे,पंढरपूरतून अनिल सावंत आणि मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सदर यादीत महाविकास आघाडीतील (Mahavika Aaghadi) घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसने देखील पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

त्यामुळे या मतदारसंघात मविआत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. तर मोहोळमधून (Mohol) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तुप्ती कदम यांच्याऐवजी राजू खरे यांना संधी दिली आहे. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (NCP Ajit Pawar) माढा मतदारसंघातून मीनल साठे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...