Wednesday, October 30, 2024
HomeराजकीयThackeray vs Shinde Shivsena : राज्यातील 'या' विधानसभा मतदारसंघांत होणार...

Thackeray vs Shinde Shivsena : राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघांत होणार मशाल-धनुष्यबाण थेट सामना

मुंबई | Mumbai

काल (मंगळवार) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसानंतर राज्यातील बऱ्याच विधानसभा मतदारसंघातील (Assembly Constituency) चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahayuti and Mahavikas Aagahdi) अनेक मतदारसंघांत बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले. पंरतु, युती-आघाड्यांकडून अनेक ठिकाणी अधिकृत उमेदवार देण्यात आले. त्यामुळे काही मतदारसंघांत युती आघाडीतील पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे. यात विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना (एकनाथ शिंदे) विरुद्ध शिवसेना (उद्धव ठाकरे) असा थेट सामना अनेक मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आला समोर; पाहा कुणाच्या वाट्याला किती जागा?

महाराष्ट्रातील (Maharashtra) २८८ विधानसभा मतदार संघांपैकी ४७ विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena vs Shivsena) असा संघर्ष दिसणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदार खासदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली.त्यानंतर शिवसेना शिंदे सेना आणि ठाकरे सेना असे दोन गट पडले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत देखील हे दोन्ही गट आमनेसामने दिसून येत आहे. यामध्ये राज्यातील ४७ विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होत आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पाच उमेदवारांची यादी जाहीर; पंढरपूरात होणार मैत्रीपूर्ण लढत?

दरम्यान, महायुतीत (Mahayuti) भाजपला (BJP) १४८, शिवसेना (एकनाथ शिंदे) ८५ तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ५१ जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस १०२, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ९६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ८७ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये पाच जास्त उमेदवार सोडले तर या जागा २८० होत आहेत. यानुसार मविआने मित्रपक्षांना ८ जागा सोडल्या आहेत.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी; शिवसेनेने दिले राष्ट्रवादी विरोधात उमेदवार, पक्षाचे एबी फॉर्मही जोडले

या मतदारसंघात होणार मशाल विरुद्ध धनुष्यबाण थेट सामना

नांदगाव
सुहास कांदे (शिंदे शिवसेना)
गणेश धात्रक (ठाकरे शिवसेना)

चोपडा
चंद्रकांत सोनवणे (शिंदे शिवसेना)
राजू तडवी (ठाकरे शिवसेना)

बुलढाणा
संजय गायकवाड (शिंदे शिवसेना)
जयश्री शेळके (ठाकरे शिवसेना)

मेहकर
संजय रायमुलकर (शिंदे शिवसेना)
सिद्धार्थ खरात (ठाकरे शिवसेना)

बाळापूर
बळीराम शिरसकर (शिंदे शिवसेना)
नितीन देशमुख (ठाकरे शिवसेना)

रामटेक
आशिष जैस्वाल (शिंदे शिवसेना)
विशाल बरबटे (ठाकरे शिवसेना)

कळमनुरी
संतोष बांगर (शिंदे शिवसेना)
संतोष टारफे (ठाकरे शिवसेना)

परभणी
आनंद भरोसे (शिंदे शिवसेना)
राहुल पाटील (ठाकरे शिवसेना)

सिल्लोड
अब्दुल सत्तार (शिंदे शिवसेना)
सुरेश बनकर (ठाकरे शिवसेना)

कन्नड
संजना जाधव (शिंदे शिवसेना)
उदयसिंह राजपूत (ठाकरे शिवसेना)

औरंगाबाद पश्चिम
संजय शिरसाट (शिंदे शिवसेना)
राजू शिंदे (ठाकरे शिवसेना)

पैठण
विलास भुमरे (शिंदे शिवसेना)
दत्ता गोर्डे (ठाकरे शिवसेना)

वैजापूर
रमेश बोरनारे (शिंदे शिवसेना)
दिनेश परदेशी (ठाकरे शिवसेना)

पालघर
राजेंद्र गावित (शिंदे शिवसेना)
जयेंद्र दुबळा (ठाकरे शिवसेना)

बोईसर
विलास तरे (शिंदे शिवसेना)
विश्वास वळवी (ठाकरे शिवसेना)

भिवंडी ग्रामीण
शांताराम मोरे (शिंदे शिवसेना)
महादेव घाटळ (ठाकरे शिवसेना)

कल्याण पश्चिम
विश्वनाथ भोईर (शिंदे शिवसेना)
सचिन बासरे (ठाकरे शिवसेना)

अंबरनाथ
बालाजी किणीकर (शिंदे शिवसेना)
राजेश वानखेडे (ठाकरे शिवसेना)

कल्याण ग्रामीण
राजेश मोरे (शिंदे शिवसेना)
सुभाष भोईर (ठाकरे शिवसेना)

ओवळा-माजीवडा
प्रताप सरनाईक (शिंदे शिवसेना)
नरेश मणेरा (ठाकरे शिवसेना)

कोपरी-पाचपाखाडी
एकनाथ शिंदे (शिंदे शिवसेना)
केदार दिघे (ठाकरे शिवसेना)

मागाठणे
प्रकाश सुर्वे (शिंदे शिवसेना)
उदेश पाटेकर (ठाकरे शिवसेना)

विक्रोळी
सुवर्णा करंजे (शिंदे शिवसेना)
सुनील राऊत (ठाकरे शिवसेना)

भांडुप पश्चिम
अशोक धर्मराज पाटील (शिंदे शिवसेना)
रमेश कोरगावकर (ठाकरे शिवसेना)

जोगेश्वरी पूर्व
मनिषा वायकर (शिंदे शिवसेना)
अनंत (बाळा) नर (ठाकरे शिवसेना)

दिंडोशी
संजय निरुपम (शिंदे शिवसेना)
सुनील प्रभू (ठाकरे शिवसेना)

अंधेरी पूर्व
मूरजी पटेल (शिंदे शिवसेना)
ऋतुजा लटके (ठाकरे शिवसेना)

चेंबुर
तुकाराम काते (शिंदे शिवसेना)
प्रकाश फातर्पेकर (ठाकरे शिवसेना)

कुर्ला
मंगेश कुडाळकर (शिंदे शिवसेना)
प्रविणा मोरजकर (ठाकरे शिवसेना)

माहिम
सदा सरवणकर (शिंदे शिवसेना)
महेश सावंत (ठाकरे शिवसेना)

वरळी
मिलिंद देवरा (शिंदे शिवसेना)
आदित्य ठाकरे (ठाकरे शिवसेना)

भायखळा
यामिनी जाधव (शिंदे शिवसेना)
मनोज जामसुतकर (ठाकरे शिवसेना)

कर्जत
महेंद्र थोरवे (शिंदे शिवसेना)
नितीन सावंत (ठाकरे शिवसेना)

महाड
भरतशेठ गोगावले (शिंदे शिवसेना)
स्नेहल जगताप (ठाकरे शिवसेना)

नेवासा
विठ्ठलराव लंघे पाटील (शिंदे शिवसेना)
शंकरराव गडाख (ठाकरे शिवसेना)

धाराशिव
अजित पिंगळे (शिंदे शिवसेना)
कैलास पाटील (ठाकरे शिवसेना)

परांडा
तानाजी सावंत (शिंदे शिवसेना)
राहुल ज्ञानेश्वर पाटील (ठाकरे शिवसेना)

बार्शी
राजेंद्र राऊत (शिंदे शिवसेना)
दिलीप सोपल (ठाकरे शिवसेना)

सांगोला
शहाजी बापू पाटील (शिंदे शिवसेना)
दीपक आबा साळुंखे (ठाकरे शिवसेना)

पाटण
शंभूराज देसाई (शिंदे शिवसेना)
हर्षद कदम (ठाकरे शिवसेना)

दापोली
योगेश कदम (शिंदे शिवसेना)
संजय कदम (ठाकरे शिवसेना)

गुहागर
राजेश बेंडल (शिंदे शिवसेना)
भास्कर जाधव (ठाकरे शिवसेना)

रत्नागिरी
उदय सामंत (शिंदे शिवसेना)
सुरेंद्रनाथ (बाळ) माने (ठाकरे शिवसेना)

राजापूर
किरण सामंत (शिंदे शिवसेना)
राजन साळवी (ठाकरे शिवसेना)

कुडाळ
नीलेश राणे (शिंदे शिवसेना)
वैभव नाईक (ठाकरे शिवसेना)

सावंतवाडी
दीपक केसरकर (शिंदे शिवसेना)
राजन तेली (ठाकरे शिवसेना)

राधानगरी
प्रकाश आबिटकर (शिंदे शिवसेना)
के. पी. पाटील (ठाकरे शिवसेना)

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या