Friday, November 22, 2024
HomeराजकीयMaharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का! फडणवीसांचा 'हा' विश्वासू नेता...

Maharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का! फडणवीसांचा ‘हा’ विश्वासू नेता हाती घेणार तुतारी

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) यांच्यातील जागावाटपावर चर्चा सुरु असून अजूनही काही जागांवरील तिढा सुटलेला नाही. तर अद्याप काही ठिकाणी बोलणी सुरु असून येत्या दोन ते तीन दिवसांत सर्वच पक्षाचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे विधानसभेच्या तोंडावर अनेक नेते पक्षांतर करत असून राजकीय पक्षांना मोठे खिंडार पडत आहे. अशातच आता भाजपला हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कुणाच्या वाट्याला किती जागा?

पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांनी आमदारकी आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.रणजितसिंह मोहिते पाटील हे आज सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (NCP Sharad Pawar) प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. मोहिते पाटील हे माढ्यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. त्यात कोणताही अडथळा ठरू नये, यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या आमदारकीचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : नाशकात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता लवकरच ‘तुतारी’ फुंकणार

दरम्यान,रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप (BJP) सोडून माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) लढवली होती. तेव्हापासूनच रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपपासून दुरावले होते. त्यांनी भाजपच्या प्रचारातही सहभाग घेतला नव्हता. यानंतर आता त्यांनी थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.

हे देखील वाचा : Ajit Pawar : त्र्यंबकेश्वरमधून अजित पवारांकडून हिरामण खोसकरांच्या उमेदवारीची अप्रत्यक्षपणे घोषणा; म्हणाले…

शरद पवारांचा अजितदादांनाही धक्का

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे परभणीचे आमदार आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे देखील आज पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी राजेंद्र शिंगणे यांचा हा पक्षप्रवेश होणार असून त्यांच्याविरोधात त्यांची पुतणी गायत्री शिंगणे बंड करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गायत्री शिंगणे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या