नाशिक | Nashik
लोकसभा निवडणुकीतील (Loksabha Election) बाबू भगरे पॅटर्नची पुनरावृत्ती होताना दिसून येत आहे. नाशिक मध्य मतदारसंघाचे (Nashik Central Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते (Vasant Gite) यांच्या विरोधात नाम साधर्म्य असलेल्या वसंत गिते यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे माजी आमदार वसंत गितेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : जिल्ह्यातून ५७ अर्ज दाखल; खोसकरांच्या उमेदवारीसाठी भुजबळांची हजेरी
दिंडोरी मतदारसंघात (Dindori Constituency) तिसरी पास बाबू सदू भगरे यांनी एक लाख मते घेत महाविकास आघाडीचे भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना घाम फोडला होता. तुतारी वाजवणारा माणूस हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत चिन्ह आहे. त्याच्याशी साधर्म्य असलेले तुतारी हे चिन्ह घेऊन बाबू भगरे दिंडोरी लोकसभेच्या मैदानात उतरले होते. केवळ नाम साधर्म्य व एकसारख्या चिन्हामुळे बाबू भगरे यांना निवडणुकीत तब्बल एक लाख तीन हजार मते मिळाली. अर्थात, त्यामुळे निकालावर परिणाम जाणवला नाही.
हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?
राज्यभरात या पॅटर्नची प्रचंड चर्चा झाली होती. ईव्हीएम मशीनवर उमेदवारांच्या यादीत बाबू भगरे हे सर्वात शेवटचे उमेदवार होते. तरीही त्यांना एवढी मते कशी मिळाली, याची दखल थेट शरद पवारांनी घेतली होती. त्याआधारे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने हे चिन्ह गोठवण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाने स्थानिक निवडणुकीत (Election) हे चिन्ह गोठवले; परंतु विधानसभा निवडणुकीत हे चिन्ह पुन्हा वापरात आणण्याची परवानगी दिली.
हे देखील वाचा : Maharashtra Assembly Elections : भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; PM मोदींसह ‘या’ ४० नेत्यांच्या समावेश
त्यामुळे राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. त्याच धर्तीवर नाशिक मध्य मतदारसंघात माजी आमदार वसंत गिते यांच्याविरोधात वसंत शंकर गिते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यांच्या उमेदवारीला कुणाचे पाठबळ लाभले आहे हे कालांतराने समोर येईलच, मात्र याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
हे देखील वाचा : Nashik Political : काँग्रेस कमिटीला कार्यकर्त्यांनी ठोकले टाळे; शहरात एकही जागा न सुटल्याने संताप
नामसाधर्म्य, पण चिन्ह वेगळे
माजी आमदार वसंत गिते यांच्या पक्षाचे चिन्ह मशाल आहे. त्यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज घेतलेले दुसरे वसंत गिते यांना पिपाणी हे चिन्ह मिळाले तर चिन्हावरून गोंधळ होण्याची शक्यता कमी असली तरी केवळ नाव बघून मतदान करणाऱ्या मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा