Thursday, January 8, 2026
HomeनगरSlow Voting : मतदान केंद्रांवर रांगाच रांगा, मतदान प्रक्रिया मात्र धिम्या गतीने…

Slow Voting : मतदान केंद्रांवर रांगाच रांगा, मतदान प्रक्रिया मात्र धिम्या गतीने…

चांदा । वार्ताहर

नेवासा तालुक्यातील चांदा येथे सकाळी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली होती. मतदारांनी मतदानासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत फक्त २५ टक्केच मतदान झाले आहे .

- Advertisement -

चांदा येथे एकूण सात बुथवर मतदान प्रक्रिया सुरु आहे. परंतू मतदान प्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याची तक्रार मतदार करत आहेत. त्यामुळे प्रत्येक बुथवरील गर्दी कमी होण्याऐवजी त्यात वाढ होत आहे. उन्हापासून सुरक्षेसाठी टाकलेला मंडप ही कमी पडत असल्याचे दिसून आले.

YouTube video player

एवढया धिम्या गतीने मतदान प्रक्रिया सुरू राहिली तर अनेक मतदार मतदानाला मुकू शकतात अशी शक्यता आहे. पुरुष मतदारांसह महिला मतदारांनाही तासनतास उभे रहावे लागत आहे. निवडणुक विभागाच्या नियोजना संदर्भात मतदारांनी जाहिर नाराजी बोलून दाखविली.

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....