Monday, October 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPolitical Special : इगतपुरी मतदारसंघात सारे काही 'नाना-मामां'च्या हाती?

Political Special : इगतपुरी मतदारसंघात सारे काही ‘नाना-मामां’च्या हाती?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ (Igatpuri-Trimbakeshwar Assembly Constituency) चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) मागील वर्षी झालेल्या राज्यसभा आणि त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे खोसकरांची चलबिचल होत होती. अखेर पर्याय शोधत खोसकर यांनी नुकताच मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांच्यासोबत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काँग्रेसचे (Congress) काही दिग्गज नेतेही राष्ट्रवादीत गेले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपची पहिली यादी जाहीर; ‘यांना’ मिळाली संधी

काँग्रेसकडून हिरामण खोसकरांना उमेदवारी देण्यास अप्रत्यक्षपणे नकार देण्यात आला. त्यावेळी खोसकर यांनी ‘आपल्यासमोर सर्व पर्याय खुले आहे’ असे म्हणत पक्षांतराचे संकेत दिले होते. ‘नाना-मामा’ जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, असेही ते म्हटले होते. त्यानंतर खोसकरांनी ‘नाना-मामा’ यांच्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ‘नाना-मामां’नी पुन्हा हिरामण खोसकरांनाच निवडून आणू, असे जाहीरपणे सांगितले. २००९ आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस उमेदवार निर्मला गावित (Nirmala Gavit) यांना निवडून आणण्यात आपला सिहांचा वाटा होता. २०१९ च्या निवडणुकीत हिरामण खोसकर यांना निवडून आणण्यात आपलीच महत्वाची भूमिका होती, असेही ‘नाना-मामा’ म्हणतात. इगतपुरीचा आमदार ‘नाना-मामा’ ठरवणार असतील तर मतदारांच्या मताला काहीच किंमत नाही का? असा प्रश्न मतदारसंघातील लोक विचारु लागले आहेत.

हे देखील वाचा : Political Special : कळवण-सुरगाणा मतदारसंघात आमदार पवार-गावितांमध्येच मुख्य लढत

दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची हिरामण खोसकर यांच्या समर्थनार्थ जनसन्मान यात्रा पार पडली. बातून पवारांनी निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा केला. यावेळी पवार यांनी इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून हिरामण खोसकर यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्ष घोषणाही केली. त्यामुळे महायुतीत ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. व्यासपीठावरून संबोधित करतांना ‘नाना-मामा’ यांनी खोसकर यांना सुमारे लाखभर मताधिक्‌याने निवडून आणण्याचा निर्धार बोलून दाखवला. हा निर्धार त्यांनी कोणत्या जोरावर केला, अशी चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे.

हे देखील वाचा : Ajit Pawar : त्र्यंबकेश्वरमधून अजित पवारांकडून हिरामण खोसकरांच्या उमेदवारीची अप्रत्यक्षपणे घोषणा; म्हणाले…

इच्छुकांची भाऊगर्दी

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांसह अनेक अपक्षही इच्छुक आहेत. त्यामुळे यंदा या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीमधील शिंदे शिवसेनेकडून माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, रवींद्र भोये इच्छुक आहेत. हिरामण खोसकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांची दावेदारी भक्कम मानली जात आहे. काँग्रेसकडून गोपाळ लहांगे, उषा बेंडकोळी, लकी जाधव, वैभव ठाकूर इच्छुक आहेत. मात्र काँग्रेसकडून माजी आमदार निर्मला गावित यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे, बाळासाहेब झोले, हरिदास लोहकरे यांच्यासह आदी अपक्ष निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या