Tuesday, October 22, 2024
Homeराजकीयनाशिक मध्यची जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सुटणार? आमदार देवयानी फरांदे तातडीने फडणवीसांच्या...

नाशिक मध्यची जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सुटणार? आमदार देवयानी फरांदे तातडीने फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईत

मुंबई | Mumbai

आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने काल (दि.२०) सोमवारी ९९ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. यात नाशिक जिल्ह्यातील पाच पैकी चार आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे. मात्र, नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांचे नाव नसल्याने त्यांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज फरांदे यांनी आपल्या समर्थक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपची पहिली यादी जाहीर; ‘यांना’ मिळाली संधी

काल भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले (Rahul Dhikle), नाशिक पश्चिममधून सीमा हिरे (Seema Hiray), बागलाणमधून दिलीप बोरसे (Dilip Borse) आणि चांदवडमधून डॉ. राहुल आहेर (Dr Rahul Aher) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे मात्र वेटिंगवर आहेत.यामुळे फरांदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

त्यानंतर आज आमदार देवयानी फरांदे यांनी मुंबई गाठत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत २४ आजी-माजी नगरसेवक देखील होते. यावेळी आमदार फरांदे यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून भाजपची (BJP) दुसरी यादी येण्यापूर्वी आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून आपली उमेदवारी फिक्स करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदार देवयानी फरांदे यांना दोन दिवस थांबण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे महायुतीत नाशिक मध्यची जागा शिंदेंच्या शिवसेनेला किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आज दुपारी एक वाजेपासून अजय बोरस्ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटते? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हे देखील वाचा : शरद पवारांच्या राष्ट्र्वादीच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर; कोण कुठून लढणार?

राहुल आहेर-केदा आहेर यांनीही घेतली फडणवीसांची भेट

भाजपच्या पहिल्या यादीत चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र तीन दिवसांपूर्वीच राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्याऐवजी बंधू केदा आहेर यांना उमेदवारी देण्याची शिफारस राहुल आहेर यांनी पक्षाकडे केली होती. मात्र भाजपच्या यादीत राहुल आहेर यांचे नाव आल्याने केदा आहेर कमालीचे नाराज झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज आहेर बंधूंनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे आहेर बंधूंच्या उमेदवारीचा निर्णय आता फडणवीसांच्या कोर्टात होणार असून यावर तोडगा निघतो का? हे बघणे महत्वाचे असणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या