Monday, October 28, 2024
HomeनाशिकNashik Political : नांदगावमध्ये महायुतीत बंडखोरी; समीर भुजबळांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

Nashik Political : नांदगावमध्ये महायुतीत बंडखोरी; समीर भुजबळांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

पक्षाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा

नाशिक | Nashik

राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी असून मंगळवार (दि.२२) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.तर दुसरीकडे बंडखोरी उफाळून येतांना पाहायला मिळत आहे. अशातच आता नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Elections 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या ‘या’ दिग्गज नेत्यांनी भरला उमेदवारी अर्ज

नांदगाव विधानसभेसाठी महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेच्या सुहास कांदे (Suhas Kande) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघातून उमेदवारीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ देखील इच्छुक होते. मात्र, सुहास कांदेंना उमेदवारी जाहीर झाल्याने समीर भुजबळ (Sameer Bhujabl) नाराज झाले होते. त्यानंतर आज भुजबळ यांनी नांदगावमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. तसेच भुजबळ यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत मुंबई अध्यक्षपदाचा देखील राजीनामा दिला आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक पश्चिममध्ये तिरंगी लढत; हिरे, बडगुजर, पाटील निवडणूक मैदानात

यावेळी बोलतांना समीर भुजबळ म्हणाले की, महायुती धर्मात अडचण निर्माण होऊ नये म्हणून मी राष्ट्रवादी पक्षाचा मुंबई प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. भयमुक्त नांदगाव तालुक्यासाठी अपक्ष उमेदवारी करणार असून तालुक्यातील विकासकामे करायची आहे. येथील दहशतवाद मिटवायचा असून नागरिक दहशतीखाली असल्याने बोलायला पुढे कोणी येत नाही ही दहशत काढायची आहे, असे माजी खासदार समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Political : माजी आमदार धनराज महाले उद्या उमेदवारी अर्ज भरणार; महायुतीमध्ये बंडखोरी?

दरम्यान, नांदगाव विधानसभा मतदारसंघातून (Nandgaon Assembly Constituency) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aagahdi) ठाकरेंच्या शिवसेनेने गणेश धात्रक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात कांदे-भुजबळ-धात्रक अशी तिहेरी लढाई पाहायला मिळणार आहे. तर समीर भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवाराला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या