नाशिक | Nashik
राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला असून राज्यभरात ठिकठिकाणी सभा आणि मेळावे पार पडत आहेत. असे,असतानाच आता नाशिकमध्ये महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांचा नरहरी झिरवाळांना पाठिंबा
नाशिकचे माजी खासदार आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी एका सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीवेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सांगत होते की, माझी उमेदवारी केंद्रातून जाहीर झाली. पण नंतर बोलले की, आता उशीर झाला आणि ते रणांगण सोडून पळून गेले. शिवसैनिक पळून गेले नाहीत. भुजबळ लोकसभेमध्ये आपल्यासोबत राहिले आणि हातावर लिहिले ३ ‘वाजे’ला मतदान करा आणि माझ्या पाठीत खंजीर खुपसला,” असा खळबळजनक आरोप हेमंत गोडसे यांनी केला आहे.
हे देखील वाचा : Maharashtra News : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मांची नियुक्ती
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघामधून (Nashik Lok Sabha Constituency) निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, मंत्री छगन भुजबळ हे इच्छुक होते. पण त्यानंतर छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यानंतर नाशिकची (Nashik) उमेदवारी थेट शेवटच्या क्षणी हेमंत गोडसे यांना जाहीर करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) हे निवडणुकीच्या मैदानात होते. अखेर राजाभाऊ वाजे यांनी हेमंत गोडसे यांचा पराभव केला. या पराभवावरून आता शिवसैनिकांच्या मेळाव्यात हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळांवर गंभीर आरोप केले आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime : तोतया आयपीएसचे कारनामे उघड; आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी बनला बोगस अधिकारी
देवळालीत महायुतीत बंडखोरी
महायुतीकडून (Mahayuti) देवळाली विधानसभेतून राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) राजश्री अहिरराव यांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडलेला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजश्री अहिरराव यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने कायम ठेवला. त्यामुळे देवळालीत महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा