Tuesday, December 3, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मांची नियुक्ती

Maharashtra News : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मांची नियुक्ती

मुंबई | Mumbai

काल केंद्रीय निवडणूक आयोगाने ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) धामधुमीत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या बदलीचे निर्देश दिले होते. त्यानंतर त्यांना राज्याच्या मुख्य सचिवांनी तात्काळ पदावरून हटवत मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. यानंतर राज्याचे पुढील महासंचालक कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

- Advertisement -

त्यानंतर आता नवीन पोलीस महासंचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा (Sanjay Kumar Verma) यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक (Director General of Police ) म्हणून निवड करण्यात आली आहे. या पदासाठी विवेक फणसाळकर, संजय कुमार वर्मा आणि संजीव कुमार सिंघल या तिघांची नावे चर्चेत होती. यानंतर अखेर संजय कुमार वर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या